Rohit Sharma  esakal
क्रीडा

Rohit Sharma : शर्माजी का बेटा 10 हजारी मनसबदार! षटकार मारला अन् आला सचिन, गांगुलीच्या पंक्तीत

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma 10000 ODI Runs : भारताचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपमधील श्रीलंकेविरूद्धच्या सुपर 4 सामन्यात 22 वी धाव करत एक मोठा माईलस्टोन पार केला. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधील आपल्या 10000 धावा पूर्ण केल्या असून तो वनडेत अशी कामगिरी करणारा भारताचा 6 वा फलंदाज ठरला आहे.

आशिया कप 2023 च्या सुपर 4 मधील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव करत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना राखीव दिवशी खेळवावा लागला.

त्यानंतर भारतीय संघाला लगेचेच दुसऱ्या दिवशी श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज व्हावे लागले. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पुन्हा भारताला दमदार सुरुवात करून दिली.

विशेष म्हणजे आक्रमक खेळणाऱ्या रोहित शर्माने षटकार मारत आपल्या वनडेमधील 10000 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा हा भारताचा वनडेमध्ये 10000 धावा पूर्ण करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी वनडे क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा कारनामा केला होता.

रोहित शर्माने 241 वनडे डावात 49.14 च्या सरासरीने 10000 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट 90.91 इतके आहे. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 50 अर्धशतके ठोकली आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT