Rohit Sharma 13,000 International Runs WTC Final  esakal
क्रीडा

Rohit Sharma WTC Final : रोहितने ओव्हलवर केलं मोठं रेकॉर्ड; तेंडुलकर अन् सेहवागच्या क्लबमध्ये दाखल

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma 13,000 International Runs WTC Final : इंग्लंडच्या ओव्हलवर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 270 धावांवर घोषित करत भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले. सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात भारतीय सलामीवीर हा धावांचा डोंगर पार करण्यासाठी मैदानावर उतरले. भारताने दुसऱ्या डावात सकारात्मक सुरूवात केली.

कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत आम्ही या 444 धावा चेस करण्यासाठी सगळा दम लावू हे दाखवून दिले. सलामी जोडीने 7 षटकात 41 धावा केल्या मात्र दुर्दैवाने शुबमन गिल पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. बोलँडच्या गोलंदाजीवर कॅमरून ग्रीनने वादग्रस्त झेल पकडला. मात्र त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने चेतेश्वर पुजारासोबत 71 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी भारताला 20 व्या षटकात 100 च्या जवळ पोहचवले.

याचदरम्यान, रोहित शर्माने एक मोठा माईल स्टोन पार केला. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13000 धावा पूर्ण केल्या. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 13,000 धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा हा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागने ही कामगिरी केली आहे. रोहित शर्माने 307 डावात ही कामगिरी केली. सर्वात वेगाने 13000 धावा करण्यात मॅथ्यू हेडन (293 डाव) आणि सचिन तेंडुलकर (295 डाव) यांचा नंबर वरचा लागतो.

रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिका धावा करणारा सलामीवीर आहे. त्याने सहा शतके आणि चार अर्धशतकांच्या जोरावर 1800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरनंतर सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 10,000, 11,000 आणि 12,000 हजार धावा पूर्ण करणार दुसरा खेळाडू ठरला आहे. रोहितने सलामीवीर म्हणून कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये मिळून 38 शतके ठोकली आहेत. त्याने कसोटीत 6, टी 20 क्रिकेटमध्ये 4 तर वनडेमध्ये 28 शतके ठोकली आहेत. त्याने वनडेत 35, टी 20 मध्ये 24 तर कसोटीत 4 अर्धशतके ठोकली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: कर्णधारपदाची सवय झाली आहे! Shubman Gill चा विंडीजच्या खांद्यावरून ऑस्ट्रेलियावर निशाणा, म्हणाला...

Javed Akhtar : माझी मान शरमेने खाली गेलीये! तालिबानी मंत्र्यांच्या स्वागतावरून संतापले जावेद अख्तर, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ रवाना

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा! 13 वर्षीय मुलीवर भावाने केला अत्याचार, दोन मित्रांचाही सहभाग; निर्जनस्थळी नेलं अन्...

संकल्पना सोप्या करणे ‘एआय’चे काम

SCROLL FOR NEXT