Rohit Sharma Esakal
क्रीडा

Rohit Sharma Video: बिल्लो नी तेरा लाल घाघरा... रोहित शर्माचा बायको रितिकासोबत स्टेज डान्स व्हायरल

रोहित शर्मा सध्या त्याच्या बायकोच्या भावाच्या लग्नात व्यस्त आहे

सकाळ डिजिटल टीम

रोहित शर्मा सध्या त्याच्या बायकोच्या भावाच्या लग्नात व्यस्त आहे. मेव्हणा कुणाल सजदेहच्या लग्नामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून सुट्टी घेतली आहे. आता कुणालच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. काळ्या कुर्ता पायजमासह गळ्यात लाल ओढणी घालून पत्नी रितिकासोबत भारतीय कर्णधाराने जबरदस्त डान्स केला आहे.

मेव्हणा कुणालच्या लग्नात रोहितने पत्नी रितिकासोबत स्टेजवर जबरदस्त डान्स केला. यादरम्यान या जोडप्याची अप्रतिम जुगलबंदीही पाहायला मिळाली. कुणालच्या लग्नात रोहित मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाहीये. इतकंच नाही तर मुलींच्या गँगच्या फोटो शूट दरम्यान त्याने खास एन्ट्री केली होती, ज्याचा फोटो रितिकाने शेअर केला होता.

रितिका तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये रोहित पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. 19 मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित भारतीय संघात परतणार आहे. यापूर्वी, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली होती.

रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल. आता रोहितच्या जागी शुभमन गिलसोबत कोण ओपनिंग करणार हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. संघ व्यवस्थापन केएल राहुलला आणखी एक संधी देते की इशान किशनला गिलसोबत सलामीची संधी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT