rohit sharma daughter samaira sakal
क्रीडा

सामायरा शर्माचा क्युट व्हिडीओ, रोहितच्या तब्येतीबद्दल म्हणतेय...

रोहित शर्मा अजूनही कोविड-19 पॉझिटिव्ह आहे, मुलगी समायराने हेल्थ दिले अपडेट

Kiran Mahanavar

India Vs England: कर्णधार रोहित शर्मा नुकताच कोविड-19 पॉझिटिव्ह झाल्यामूळे लाखो चाहते खूप चिंतेत आहे. रोहित शर्मा 1 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटीत सामाना खेळणार की नाही हे आतापर्यंत स्पष्ट झाले नाही. रोहित शर्मा सध्या आयसोलेशनमध्ये आहे. त्याचा अलीकडीच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहित हसत थम्स-अप करत आहे. दरम्यान, रोहितच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आई रितिकासोबत हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे.

हॉटेलमधून बाहेर पडताना बाजूला बसलेल्या कोणीतरी समायराला प्रश्न विचारला. समायरा थांबते आणि हसते आणि अगदी निरागसपणे उत्तर देते, पापा खोलीत आराम करत आहेत कारण ते अजूनही कोविड पॉझिटिव्ह आहेत. समायराच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर लाखो मने जिंकली आहेत.

भारत आणि लीसेस्टरशायर यांच्यात झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्मा कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला होता. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला आशा आहे की रोहित शर्मा १ जुलैपासून होणारी कसोटी सामन्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल.

रोहित शर्मा न खेळल्यास बीसीसीआयने बॅकअप प्लॅन पण तयार केला आहे. बॅकअप सलामीवीर म्हणून मयंक अग्रवाल सोमवारी इंग्लंडला रवाना आला आहे. मयंक अग्रवाल आज टीम इंडिया बरोबर सामील होणार आहे. बीसीसीआयने अद्याप कर्णधाराबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. रोहित शर्मा खेळला नाही तर जसप्रीत बुमराहकडे संघाची कमान येऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. ऋषभ पंतही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT