Rohit Sharma Dedicated Fifty To Dog
Rohit Sharma Dedicated Fifty To Dog esakal
क्रीडा

Rohit Sharma VIDEO: रोहित झाला भावूक... निधन झालेल्या घरातील लाडक्या सदस्याला केले अर्धशतक समर्पित

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Dedicated Fifty To Dog : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ब्रेकनंतर पुनरागमन करत दमदार खेळी केली. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल सोबत 19 षटकातच 143 धावांची सलामी दिली. रोहित शर्माने 67 चेंडूत 83 धावा ठोकल्या. मात्र रोहित शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच तो बाद झाला. रोहितने बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली होती. तोच फॉर्म त्याने आजच्या सामन्यात देखील कायम ठेवला.

जरी रोहित शर्माला शतकी खेळी करता आली नसली तरी त्याच्यासाठी ही अर्धशतकी खेळी खूप खास होती. कारण ही अर्धशतकी खेळी त्याच्या पाळीव श्वानासाठी होती. त्याने हे अर्धशतक काही दिवसांपूर्वीच निधन पावलेल्या आपल्या श्वानाला समर्पित केले आहे. अर्धशतकानंतर रोहित भावून झाल्याचे सर्वांनी पाहिले.

दरम्यान, रोहितची पत्नी रितिकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या घरातील एक लाडका सदस्य सोडून गेल्याची भावना व्यक्त केली होती. रितिका पोस्टमध्ये म्हणते. 'कालचा दिवस आमच्यासाठी खूप कठिण गेला. आम्ही आमच्या लाडक्या प्रेमळ श्वानाला अखेरचा निरोप दिला. तू आमचा सर्वात लाडका फरबेबी होतास. माझं पहिलं प्रेम, माझा बेबी खूप प्रेमळ फरबॉल. जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत आमच्या आयुष्यात जादूची कमतरता असणार.' (Sports Latest News)

भारताने पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर 50 षटकात 7 बाद 373 धावा उभारल्या. भारताकडून विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. मात्र सलामीवीर रोहित शर्माला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो 67 धावात 83 धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने देखील 70 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने 10 षटकात 88 धावा देत 3 बळी टिपले.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT