rohit sharma deepak chahar kuldeep sen ruled out of ind vs ban third odi say rahul dravid cricket news sakal
क्रीडा

IND vs BAN: मालिका तर गेली अन् टीम इंडियाला मिळाले रोहितसह तीन मोठे धक्के!

Kiran Mahanavar

Rohit Sharma Injury IND vs BAN :बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. रोहित यापुढे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही आणि कसोटी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, दुसरा सामना संपल्यानंतर द्रविडने सांगितले की रोहित तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी मुंबईला जाणार आहे. वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो खेळणार नाही. याशिवाय रोहित कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकेल की नाही याचीही खात्री द्रविडला नाही. रोहितच्या अंगठ्याला फ्रॅक्चर नसले तरी त्याची दुखापत गंभीर असू शकते.

पण आता मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर रोजी चितगाव येथे होणार आहे. याआधीही टीम इंडियासाठी ही वाईट बातमी समोर आली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'नक्कीच कुलदीप, दीपक आणि रोहित पुढील सामन्यात खेळू शकणार नाहीत. कुलदीप आणि दीपक मालिकेतून बाहेर आहेत. रोहितही पुढचा सामना खेळू शकणार नाही.

रोहितशिवाय दीपक चहर आणि कुलदीप सेन दोन खेळाडूही मुंबईला परतणार आहेत. दुसरा एकदिवसीय सामना खेळत असलेला दीपक हॅमस्ट्रिंगच्या समस्येशी झुंजत आहे, तर अनकॅप्ड खेळाडू कुलदीप सेनला पाठीला दुखापत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT