Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma : मला वाटलं हे सर्व सोडून जावं लागेल... रोहितनं सांगितलं वर्ल्डकपची फायनल हरल्यानंतर काय केलं?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma First Reaction After World Cup Final Lost : भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 19 नोव्हेंबर 2023 पासून गायब होता. तो ना माध्यमांना सामोरा गेला ना तो ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत दिसला. 19 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत रोहितसह प्रत्येक भारतीयाचे ह्रदय तोडले होते.

दरम्यान, रोहित शर्माने जवळपास महिन्याभरानंतर या पराभवावर भाष्य केलं आहे. तो इन्स्टाग्रावरील चर्चेत भावूक झाला होता. या पराभवातून बाहेर कसं यायचं हे त्याला कळतच नव्हतं असं तो म्हणाला. फायनलपर्यंत सगळं एकदम मनासारखं होत होतं. मात्र एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. त्याला यातून बाहेर पडणं खूप जड गेल्याचं तो म्हणाला.

रोहित शर्मा इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून म्हणाला की, 'मला बरेच दिवस कळतच नव्हतं की यातून कसं बाहेर पडायचं. काय करायचं असतं हेच मला कळत नव्हतं. माझे मित्र, कुटुंबाने मला पाठिंबा दिला अन् यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या आसपासच्या सर्व गोष्टी हलक्या फुलक्या ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.'

तो पराभव पचवणं सोपं नव्हतं. मात्र आयुष्य पुढं सरकत राहतं. तुम्हाला आयुष्यात पुढं जात रहावं लागतं. मात्र खरं सांगायचं तर हे खूप कठिण आहे. असं पुढं जाणं सोपं नाही. मी वनडे वर्ल्डकप पाहतच मोठा झालो आहे. माझ्यासाठी वनडे वर्ल्डकपच सर्वात मोठा पुरस्कार होता.'

रोहित पुढे म्हणाला की, तुम्ही दुसरी बाजू पाहिली तर मला माझ्या संघाचा खूप अभिमान वाटतो. कारण त्यांनी संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. तुम्हाल अशी कामगिरी प्रत्येक वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही.

जर तुम्ही लोकांना खूप आनंद दिला असेल, तुम्ही ती फायनल खेळल्याबद्दल अभिमान वाटत असेल तर गोष्टी अजूनच अवघड होतात. त्यामुळे मला वाटलं की हे सर्व सोडून कुठं तरी जावं. मात्र मी कोठेही असलो तरी लोकं माझ्याजवळ येत होती आणि संघाच्या कामगिरीची प्रशंसा करत होती. खरं तर पराभवाच्या नैराश्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मला यातूनच मिळाली.

मला अनेकवेळा वाटलं की जर कोणी मला विचारलं तुम्ही 10 पैकी 10 सामने तुम्ही जिंकला फायनलमध्ये काय चुकलं तर मी त्यांना सांगेन की आम्ही चुका केल्या मात्र आम्ही आमच्या परीने सर्वस्व दिलं. मात्र चुका प्रत्येक सामन्यात होतात. तुम्ही प्रत्येक सामन्यात एकसारखं खेळू शकत नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT