क्रीडा

Ind Vs Eng : सौरव गांगुलीला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा मोठा पराक्रम

Kiran Mahanavar

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी केली आणि त्यानंतर फलंदाजीतही आपली ताकद दाखवून दिली.

"बेसबॉल" क्रिकेट इंग्लंडच्या फलंदाजांकडून अपेक्षा करत होतो, पण कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्याकडून पाहायला मिळाली. या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 119 धावा केल्या.

भारताची एकमेव विकेट कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पडली. रोहितला 24 धावांवर जॅक लीचने बाद केले, पण आऊट होण्यापूर्वी रोहितने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला. रोहित शर्माने पहिल्या डावात 24 धावा करताच आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यानंतर रोहितने आता आपले नाव नोंदवले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 27 चेंडूत 24 धावा केल्या, यासह तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. यापूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 485 डावांमध्ये 18,433 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याने 38 शतके आणि 106 अर्धशतके झळकावली होती. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर होता.

त्याच वेळी, रोहित शर्माच्या इंग्लंडविरुद्धच्या 24 धावांच्या खेळीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,444 धावा केल्या आहेत. हा आकडा गाठण्यासाठी रोहितला 490 डाव लागले. यासोबतच त्याने 46 शतके आणि 100 अर्धशतकेही केली आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. सचिनने भारतासाठी 34,357 धावा केल्या आहेत. सचिननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली आहे, ज्याने 26,733 धावा केल्या आहेत.

भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने भारतासाठी 599 डावांमध्ये 45 च्या उत्कृष्ट सरासरीने 24,064 धावा केल्या आहेत. राहुलने या कालावधीत 48 शतके आणि 145 अर्धशतकेही केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT