rohit sharma has not scored a century from last 2 years gautam gambhir sakal
क्रीडा

Rohit Sharma: ''कर्णधार रोहितला विराट प्रमाणे धडा शिकवला पाहिजे''

सकाळ ऑनलाईन टीम

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 29 शतकेही झळकावली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला शतक झळकावता आलेले नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही रोहितला मोठी खेळी खेळता आली नाही. 2020 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धचे शेवटचे एकदिवसीय शतक केले होते. 50 डावात त्याला शतक झळकावता आले नाही. माजी क्रिकेटर गौतम गंभीर या विक्रमावर चांगलाच संतापला. आता रोहितने विराटसारखे व्हायला हवे, असे गौतमचे म्हणणे आहे. (rohit sharma has not scored a century from last 2 years)

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये गौतम म्हणाला की, मला वाटतं आपण रोहितशी बोलायला हवं. जसे आपण विराटसोबत केले होते, जेव्हा विराटने साडेतीन वर्षे शतक केले नव्हते. त्यामुळे रोहित शर्माबाबत आपण तितकेच कठोर असले पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 डाव खूप असतात.

रोहितच्या फॉर्मबद्दल पुढे बोलताना गौतम म्हणाला, एक-दोन मालिकांमध्ये तुम्हाला शतक करता आले नाही असे नाही. गेल्या विश्वचषकापासून रोहित काही चांगला खेळत नाही. तो एवढी मोठी शतके झळकावायचा. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय, तो चेंडूला चांगला मारतोय. मात्र त्याला आपल्या डावाचे शतकात रूपांतर करावे लागेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी एक गोष्ट खास आहे. म्हणजेच विराटला त्याचा फॉर्म परत मिळाला आहे. रोहित शर्माला किमान विश्वचषकापूर्वी फॉर्म मिळवावा लागेल. कारण भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर हे दोन खेळाडू भारतासाठी सर्वात महत्त्वाचे असतील.

रोहितला फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 डावात शतक झळकावता आलेले नाही. गेल्या दोन वर्षांत रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात या फॉरमॅटमधील सर्वात मोठी खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने 83 धावा केल्या. तिसऱ्या वनडेत रोहितला एकूण 42 धावा करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Hapus Mango Crisis : चक्रीवादळ ते अवकाळी पाऊस; जागतिक कीर्तीचा हापूस आंबा आता धोक्यात? वाचा सविस्तर रिपोर्ट

प्रेमासाठी धर्म बदलायला तयार होती नयनतारा, मग का नाही झालं प्रभुदेवाशी लग्न? 'त्या' अटींमुळे होत्याचं नव्हतं झालं

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

Solapur Hyderabad Flight : सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! 17 एप्रिलपासून विमान प्रवासाचं गणित बदलणार; पहा नवीन वेळापत्रक

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

SCROLL FOR NEXT