Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma : रोहितनं हार्दिकला दिलं टेन्शन; मुंबई इंडियन्सनं काढून घेतलं मात्र बीसीसीआय...?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma T20I Captain : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्या हा आयपीएल 2024 च्या हंगामात कर्णधार असेल अशी घोषणा केली. या घोषणेनंतर क्रिकेट वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून बाजूला केल्यानंतर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.

क्रिकेट चाहत्यांचा हार्दिक पांड्यावर देखील रोष आहे. मात्र रोहित शर्मासाठी एक दिलासादायक बातमी देखील पुढे येत आहे. हार्दिक पांड्याला जरी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाले असले तरी भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदासाठी अजूनही रोहित शर्माच बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची, निवडसमिती आणि प्रशिक्षकांची पहिली पसंती आहे.

स्पोर्ट्स कीडाने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून हटवण्याचा कोणताही परिणाम बीसीसीआय, निवडसमिती आणि प्रशिक्षकांवर होणार नाहीये. रोहित शर्मा हा अजूनही टी 20 वर्ल्डकपसाठी संघ व्यवस्थापनतील वरिष्ठ लोकांची कर्णधार म्हणून रोहिलाच पहिली पसंती आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. त्यावेळी त्याच्या सेल्फलेस खेळीचं आणि नेतृत्व गुणांचं कौतुक झालं होतं. भारताने वनडे वर्ल्डकपमधील 11 पैकी 10 सामना जिंकून स्पर्धेवर आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं.

भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा अंतिम सामना जरी गमावला असला तरी रोहितच्या नेतृत्वावर निवडसमिती आणि बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकारी देखील खूष आहेत. त्यामुळे सहा महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी देखील रोहितकडेच संघाची धुरा सोपवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमिती सदस्यांमध्ये मध्यंतरी एक बैठक झाली होती. प्रशिक्षक आणि निवडसमिती सदस्य रोहितनेच टी 20 वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व करावे यासाठी आग्रही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT