क्रीडा

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरच्या यादीत

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022 च्या (Wisden's Cricketers of the Year) यादीत समावेश करण्यात आला आहे. या दोघांचा पाच जणांच्या यादीत समावेश आहे. या दोघांबरोबरच न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवॉय, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि दक्षिण आफ्रिकेची महिला खेळाडू डॅनी वॅन नाईकेर्क यांचा देखील विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याला जागतिक स्तरावरील लिडिंग क्रिकेटर (पुरूष) तर दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील खेळाडू लिझले ली हिला जागतिक स्तरावरील लिडिंग क्रिकेटर (महिला) हा पुरस्कार देण्यात आला. यांच्या जोडीला पाकिस्तानचा विकेट किपर बॅट्समन मोहम्मद रिझवानला लिडिंग टी 20 क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आले आहे.

भारताच्या जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरी केली होती. त्याने लॉर्ड्स आणि ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यात मॅच विनिंग स्पेल टाकला होता. ओव्हल कसोटीनंतर भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. तर रोहित शर्माने सलामीला येत चार कसोटीत 52.57 च्या सरासरीने 368 धावा केल्या होत्या. रोहितने ओव्हलवर 127 धावांची सामन्याला कलाटणी देणारी खेळी केली होती. हे रोहितचे परदेशातील पहिले कसोटी शतक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT