Rohit Sharma leave mumbai indians change ipl happen through trade csk ipl 2024 auction latest update marathi news  
क्रीडा

Rohit Sharma : रोहित दिसणार CSK च्या पिवळ्या जर्सीमध्ये? माजी खेळाडूच्या ट्विटमुळे खळबळ, फ्रँचाईझीने दिलं उत्तर

Kiran Mahanavar

Rohit Sharma IPL auction 2024 : इंडियन प्रीमियर लीगमधील लिलावादरम्यान अनेक रोमांचक गोष्टी घडतात. मात्र मंगळवारी जे घडले ते खरोखरच आश्चर्यकारक होते. सर्व आयपीएल संघ मालकांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला 20.25 कोटी रुपये देण्यात आले. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने आणि कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले.

लिलावानंतर, ट्रेड विंडो उघडल्यानंतर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा संघ सोडू शकतो का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. याआधी भारतीय संघाचा माजी खेळाडू एस बद्रीनाथने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये रोहित चेन्नई सुपर किंग्जचा टी-शर्ट परिधान केलेला दिसत होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, असे झाले तर काय होईल. आता या संपूर्ण प्रकरणावर एक मोठे अपडेट आले आहे.

मुंबई इंडियन्सशी संबंधित एका अधिकाऱ्याने 'क्रिकबझ'ला सांगितले की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत मीडियामध्ये अनावश्यक बातम्या येत आहेत. ते कुठेही जात नाहीत आणि ते मुंबई संघासोबत खेळणार आहे.

या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व खेळाडूंची संमती घेण्यात आली होती, ज्यामध्ये स्वतः रोहितचाही समावेश होता. त्यामुळे इतर सर्व गोष्टी खोट्या आहेत. प्रत्येक खेळाडूने हा निर्णय मान्य केला आहे.

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स संघाकडून हार्दिक पांड्याला ट्रेड केले, तो आता मुंबईचे कर्णधारही असणार आहे. पांड्याचा ट्रेड होताच तो मुंबईचा कर्णधार होऊ शकतो अशा अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यावर खुद्द मुंबई इंडियन्सने ही घोषणा केली. यानंतर अनेक चाहते संतापले.

2013 पासून मुंबईचे कर्णधारपद भूषवत रोहितने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले. ज्या पद्धतीने रोहितकडून कर्णधारपद घेतले गेले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ रोहित शर्माला ट्रेड करू इच्छित असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले. आता या फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने या सर्व प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT