West Indies Vs India 2nd Test Day 4 esakal
क्रीडा

WI vs IND 2nd Test : चौथ्या दिवशी रोहित, सिराजसह पावसाचेही थैमान तरी सामन्यावर भारताची पकड

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 2nd Test Day 4 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने विंडीसमोर विजयासाठी 364 धावांचे आव्हान ठेवले. याच्या प्रत्युत्तरात विंडीजने दिवसअखेर 2 बाद 72 धावा केल्या आहेत. भारताकडून अश्विनने दोन विकेट्स घेतल्या आहेत.

भारताने विंडीजचा पहिला डाव 255 धावात गुंडाळल्यानंतर 183 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला. भारताकडून चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजने 5 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रोहित शर्माने (Rohit Sharma) आक्रमक 57 आणि इशान किशनने (Ishan Kishan) 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.

भारताने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी कमाल केली. अवघ्या 26 धावात विंजीजचे उरलेले पाच फलंदाज बाद करत त्यांचा पहिला डाव 255 धावात गुंडाळला.

दिवसाची सुरूवात मुकेश कुमारने सेट झालेल्या अथनाझेला 37 धावांवर बाद करत केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) उरलेल्या चार विंडीज फलंदाजांना एका पाठोपाठ एक माघारी धाडले. भारताकडे आता पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर भारताने आक्रमक फंलदाजी करत आपला दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 57 धावांची तर इशान किशनने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जैसवालने 37 तर शुभमन गिलने 27 धावांचे योगदान दिले.

भारताने विंडसमोर 364 धावांचे आव्हान ठेवले. यानंतर चौथ्या दिवसअखेर पर्यंत वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी झुंजारवृत्ती दाखवत 2 विकेट्सच्या बदल्यात 76 धावा केल्या.

कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 28 धावा केल्या. तर तेगनारायण चंद्रपॉल 24 आणि ब्लॅकवूडन 20 धावा करून नाबाद राहिले. आता सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी विंडीजचे 8 फलंदाज बाद करायचे आहेत तर विंडीजला 289 धावा करायच्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 438 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 255 धावात संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात 183 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT