Rohit Sharma Nose Bleeding sakal
क्रीडा

Rohit Sharma : नाकातून रक्त येत होते तरी रोहितने सोडलं नाही मैदान, पाहा Video

रोहितच्या नाकातून रक्त येऊ लागले मात्र टॉवेलने नाक पुसत...

Kiran Mahanavar

Rohit Sharma Nose Bleeding Ind vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला केवळ 221 धावा करता आल्या आणि 16 धावांनी सामना गमावला.

टीम इंडियाच्या या विजयात भारताच्या पहिल्या चार फलंदाजांनी सर्वाधिक योगदान होते. रोहित, राहुल, विराट आणि सूर्यकुमार यांनी शानदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 237 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर आफ्रिकन संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. या सामन्यात रोहित शर्माने सर्वांची मने जिंकली. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ गोलंदाजी करत होता. त्यादरम्यान रोहितच्या नाकातून रक्त येऊ लागले. मात्र हिटमॅनने मैदान सोडले नाही. तो टॉवेलने नाक पुसत गोलंदाज हर्षल पटेलला सूचना देत राहिला. त्याच्या समर्पणाने सर्वांची मने जिंकली.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 11व्या षटकात ही घटना घडली. डी कॉक आणि मिलर फलंदाजी करत होते. हर्षल पटेलच्या षटकातील पहिल्या चेंडूनंतर रोहित नाक साफ करताना कॅमेऱ्यात कैद झाला. दिनेश कार्तिक त्याच्याकडे गेला आणि त्याने लगेच फिजिओला मैदानात येण्याचे संकेत दिले. रोहितच्या नाकातून रक्त येत होते, मात्र असे असतानाही मैदान सोडण्यापूर्वी त्याने आपला गोलंदाज हर्षल पटेलला फील्ड प्लेसमेंटची संपूर्ण माहिती दिली. यानंतर फिजिओने रोहितला मैदानाबाहेर गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

Latest Marathi News Live Update : शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांचा अपघात; भरधाव कारने दिली धडक

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

SCROLL FOR NEXT