rohit sharma press conference before india vs pakistan sakal
क्रीडा

पाक दौऱ्याबाबत जय शाहनंतर आता कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य, म्हणाला...

रोहित शर्माने पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला दिले चोख उत्तर

Kiran Mahanavar

T20 World Cup Rohit Sharma : बीसीसीआयमध्ये सचिव पदाची दुसरी टर्म मिळाल्या मिळाल्या जय शहा यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताला 2023 च्या वर्ल्डकपमधून पाकिस्तान माघार घेईल अशी धमकी दिली. या सर्व पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर भारत विरूद्ध पाकिस्तान वाद पेटला. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा या बाबत वक्तव्य केले आहे.

मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची तयारी जोरात सुरू आहे. आता सामना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. ज्यात पाकिस्तानी पत्रकाराने एक प्रश्न विचारला की भारताने पाकिस्तानचा दौरा केला पाहिजे का?. यावर रोहित म्हणाला की, माझे लक्ष फक्त टी-20 वर्ल्ड कपवर आहे. मी याचा विचार करत नाही. याबाबत बीसीसीआय निर्णय घेईल.

टीम इंडियाचे सर्व खेळाडू या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत संघावर कोणतेही दडपण नाही. मोहम्मद शमी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही, पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्माने सांगितले. भारतीय कर्णधाराने सांगितले की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी संघ पूर्णपणे तयार आहे. हिटमॅन मेलबर्नच्या हवामानाबद्दलही बोलला. ते म्हणाले की, येथील हवामान प्रत्येक क्षणाला बदलत आहे. सामन्यादरम्यान संघ सर्व परिस्थितींसाठी तयार असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT