rohit sharma punch dinesh karthik 
क्रीडा

VIDEO: भारताच्या पराभवावर कार्तिकने वाजवली टाळी तर रोहितने मारला ठोसा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली

Kiran Mahanavar

India vs South Africa : टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 49 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये दिनेश कार्तिक टाळ्या वाजवताना दिसला.

कर्णधार रोहित शर्माने हे पाहिल्यानंतर त्याला ठोसा मारला. याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत पराभूत केले.

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सुरुवातीपासूनच येथे गुडघे टेकले आणि फलंदाज पूर्णपणे फ्लॉप दिसले. कर्णधार रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही, त्याच्यापाठोपाठ ऋषभ पंत, श्रेयस अय्यरही स्वस्तात माघारी परतले. दिनेश कार्तिकने अव्वल क्रमवारीत येऊन 46 धावांची धडाकेबाज खेळी केली, पण तो एकटा काही करू शकला नाही.

रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात जे काही घडले ते फक्त त्याच्या हास्याचा भाग होता. भारताच्या पराभवानंतर ही फोटो मैदानावरील कॅमेऱ्यांनी टिपली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की, पराभवानंतर कार्तिकने टाळी वाजवली तेव्हा रोहित शर्माने त्याच्या पाठीवर जोरात ठोसा मारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

अल निनोमुळे 'पाणीबाणी', राज्यात ऑगस्ट २०२७पर्यंत पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय, साठा राखीव ठेवण्याचे आदेश

७५ वर्षीय आजोबांचं नातीसोबत अश्लील वर्तन, संतापलेल्या २० वर्षीय तरुणीने आजोबांना संपवलं; क्रिकेट बॅटने डोक्यात वार करत...

WCL 2026, IND vs PAK: पाकडे पुन्हा तोंडावर आपटले! भारताकडून हवी होती लेखी माफी पण... क्रिकेटच्या मैदानात राडा

SCROLL FOR NEXT