Rohit Sharma India Vs Pakistan World Cup 2023 esakal
क्रीडा

Rohit Sharma : पाकिस्तानवरील विजयानंतरही रोहित नाही फार उत्साही... म्हणतो फिंगर क्रॉस

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma India Vs Pakistan World Cup 2023 : अहमदाबादमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने परंपरा, अनुशासन आणि प्रतिष्ठा जपत आठवा पराभव शेजाऱ्यांना थाळीत सजवून दिला. पाकिस्तानला 191 धावात रोखल्यानंतर रोहित शर्माच्या 63 चेंडूत केलेल्या 86 धावांच्या जोरावर भारताने हे आव्हान 30.3 षटकातच पार केले. तब्बल 20 षटके आणि सात विकेट्स राखून भारताने विजय मिळवला.

या विजयानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. मात्र या प्रतिक्रियेवेळी त्याने आपण या विजयाने हुरळून जाणार नसल्याचे सांगितले. रोहितने आजच्या विजयाचे श्रेय हे भारतीय गोलंदाजांना दिले. रोहित म्हणाला, 'आजचा सामना गोलंदाजांनी जिंकून दिला. मला नाही वाटत की ही 190 धावांची खेळपट्टी होती. आम्ही या खेळपट्टीवर 280 धावा होतील असा अंदाज वर्तवला होता.'

'आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांना इतक्या कमी धावात रोखलं. प्रत्येक गोलंदाजानं चेंडू हातात येताच त्याचं काम केलं. आमच्याकडे सहा गोलंदाज आहेत. माझी कर्णधार म्हणून भुमिका देखील महत्वाची आहे. परिस्थितीनुसार कोणता खेळाडू कोणती भुमिका योग्य प्रकारे निभावू शकतो हे ठरवणे.'

'आम्ही वर्ल्डकपपूर्वी भरपूर धावा केल्या आहेत. आमच्यामध्ये धोरणांवरून स्पष्टता आहे. आम्ही द्विधा मनस्थितीत जात नाही. कोण कुठे फलंदाजी करणार हे ठरलेलं आहे. एकंदर आमची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र आम्ही आमचे फिंगर क्रोस ठेवणार आहोत. आम्ही फार उत्साही होणार नाही की फार निराशेत देखील जाणार नाही. आम्ही समतोल साधणार आहोत आणि पुढची वाटचाल करत राहणार आहोत.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'आम्ही ज्या प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध खेळणार आहोत तो प्रत्येक संघ हा दर्जेदारच आहे. आम्ही त्या त्या दिवशी चांगली कामगिरी करण्याचे धोरण अवलंबणार आहोत.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT