Rohit Sharma  esakal
क्रीडा

Rohit Sharma : ही तर मोठी डोकेदुखी... पहिल्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा असं का म्हणाला?

रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला पहिल्या कसोटीपूर्वी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma India Vs England 1st Test : भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटीपूर्वी आज (दि. 24) पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी रोहित शर्माने या कसोटी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनासमोर कोणते आव्हान आहे हे सांगितले.

रोहित शर्मा म्हणाला की पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघा व्यवस्थापनासमोर तिसरा फिरकीपटू निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. प्लेईंग 11 मध्ये कोणाला तिसरा फिरकीपटू म्हणून संधी द्यायची ही डोकेदुखीच ठरणार आहे. तिसऱ्या फिरकीपटूसाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यात मोठी चुरस आहे.

रोहित शर्माने सामन्यापूर्वी तिसरा फिरकीपटू म्हणून संघ व्यवस्थापनाकडून अक्षर पटेलला झुकतं माप मिळेल असा संकेत देखील दिला. संघातील डेप्थ अखोरेखित करणारा हा संकेत आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, 'जर खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत नसेल तर कुलदीप यादव हा अशा खेळपट्टीवर घातक ठरू शकतो कारण त्याच्याकडे चांगले व्हेरिएशन आहेत. नक्कीच गेल्या काही वर्षाच्या तुलनेत आता तो परिपक्व गोलंदाज झाला आहे.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'त्याने जास्त कसोटी क्रिकेट खेळलेलं नाही कारण भारतीय संघात अश्विन आणि जडेजा आहेत. आपण यापूर्वीही पाहिलं आहे की आमच्या संघातील अनेक मधल्या फळीतील फलंदाजांना उशिराच संधी मिळाली आहे. मात्र हेच वास्तव आहे. तुम्ही याच्यापासून लपू शकत नाही. मात्र नक्कीत कुलदीप हा उत्तम पर्याय आहे.'

रोहितने पहिल्या कसोटीच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला खेळवणार हे स्पष्टपणे न सांगता त्याने अक्षर पटेलबाबत संकेत दिले. तो म्हणाला की, अक्षर हा डावखुरा फिरकीपटू आहे. त्याचबरोबर त्याचे अष्टपैलुत्व देखील संघासाठी खूप महत्वाचं ठरतं असंही रोहित म्हणाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT