Rohit Sharma On T20 Career:  sakal
क्रीडा

IND vs Sl: कर्णधार रोहित शर्मा टी-20 क्रिकेटला करणार अलविदा? पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या टी-20 कारकिर्दीवर मोठे वक्तव्य केले...

Kiran Mahanavar

Rohit Sharma On T20 Career: टी-20 वर्ल्ड कप 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या स्पर्धेनंतर तो भारताकडून एकही टी-20 सामना खेळलेला नाही. रोहित शर्माला आता टी-20 संघात स्थान मिळणार नाही, असा दावाही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या टी-20 कारकिर्दीवर मोठे वक्तव्य केले.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले की, पहिली गोष्ट म्हणजे सतत सामने खेळणे शक्य नाही. तुम्हाला त्यांना पुरेशी विश्रांती देण्याची गरज आहे. माझ्या बाबतीतही तेच आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. याबाबत आयपीएलनंतर काहीतरी विचार करू. टी-20 आंतरराष्ट्रीय सामने सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर बोर्डाला 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा संघ तयार करायचा आहे. रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी KL राहुल यांना श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेसाठी लहान फॉरमॅट संघात समाविष्ट करण्यात आले नाही. अशा स्थितीत आगामी टी-20 मालिकेतही त्याला संधी मिळणे कठीण जात आहे.

रोहित शर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत 148 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या 30.82 च्या सरासरीने 3853 धावा आहेत. रोहित शर्माने टी-20 मध्ये भारताकडून आतापर्यंत 29 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत. तो टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतक करणारा खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT