क्रीडा

World Cup 2019 : दुसरा विराट नाही, पहिला रोहित!

ज्ञानेश भुरे

वर्ल्ड कप 2019 : लीड्स : यंदाच्या स्पर्धेत रोहित कमालीच्या सातत्यत्ने खेळत आहे. खरे तर दोन सामन्यात खेळला नाही की तो खेळत नाही असे बोलले जात होते. ते काही अंशी खरे हित होते. पण ही स्पर्धा त्याचसाठी खरंच खास ठरली. अगदी शकीब सारखी. सहशेहून आधी धावा आणि 11 बळी अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली तो बांगलादेश संघाचा देवदूत बनून आला. तसाच रोहित भारतासाठी धावून आला. कमालीचे सातत्य त्याने राखले. भारतीय फलंदाजी नुसतीच तोड फोड नाही तर ती तंत्रपूर्णअसते हे पुन्हा सिद्ध झाले. रोहितची देहबोली अशी दिसते की तो ड्रेसिंग रूम मधूनच आपल्या नावावर शतक लिहून येतो. आता रोहित खेळायला आला की आले शतक असे जर कुणी म्हणाले तर चूकीचे ठरणार नाही.

रोहितची फलंदाजी सध्या मोहिनी ठरली आहे. यावेळी इंग्लंडमध्ये धावाच धावा निघतील असे बोलले जात होते. टीम च्या बाबतीत हे खूप कमी वेळा घडले असेल, पण, रोहित, शकीब, वॉर्नर, फिंच या फलंदाजांच्या बाबतीत हे घडून आले आहे. रोहित ने गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व राखले. ज्या मलिंगाने स्पर्धेत धडकी भरवली ती देखील रोहित समोर जणू नतमस्तक झाला होता. अचूकता आणि आक्रमकता याचे दुसरे नाव रोहित हे या स्पर्धेतून दिसून आले.

भारताने या स्पर्धेत मिळवलेल्या विजयात एक फलंदाज कमी पडताना दिसून येत आहे. पण रोहित ही सगळी जबाबदारी जणू आपल्या खांद्यावर घेऊन खेळत आहे असेच चित्र आहे. रोहितचे सातत्य आणि भारताचे मधल्याफळीतले अप यश बघता रोहितने सगळ्या क्रमांकावर खेळावे असे म्हंटले तर कसे वाटते. तो तसाच खेळत आहे. रोहितची आता पाच शतके झाली. पण त्याने याहून एक मोठी खेळी करावी ही अपेक्षा आहे. अजुन दोन सामने आपण नक्की खेळणार ही खेळी व्हायला हरकत नाही. कम ऑन रो हिट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT