esakal esakal
क्रीडा

Devendra Fadnavis: "रोहित शर्माकडून राजकारण्यांनी शिकावं..."; देवेंद्र फडणवीसांनी काय सल्ला दिला?

Devendra Fadnavis on Rohit sharma: रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम आहेत. टी २० मधील तो यशस्वी कर्णधार आहे. कर्णधार म्हणून त्याने मिळवलेला विश्वास आणि त्याची नेतृत्व क्षमता भारतीय क्रिकेटसाठी अनमोल ठरली आहे.

Sandip Kapde

Devendra Fadnavis: भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानभवनात मुंबईतील खेळाडूंचा सत्कार केला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, आणि यशस्वी जयस्वाल यांचा सहभाग होता. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि रोहित शर्माच्या कप्तानसीची स्तुती केली.

रोहित शर्माच्या कप्तानसीची विशेषता-

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राजकारण्यांनी रोहित शर्माकडून शिकावं. रोहित शर्मा जेव्हा पत्रकार परिषद घेतो तेव्हा तो कमीतकमी बोलून देखील आपल्या देहबोलीवरून उत्तर देतो, हे सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे ती कला आहे." फडणवीसांच्या या वक्तव्याने रोहितच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांनी किती विश्वास आहे, हे स्पष्ट केले.

टी २० विश्वचषक विजेते संघाचे कौतुक-

भारतीय संघाने टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या संघातील चार खेळाडूंचे महाराष्ट्र विधानभवनात स्वागत करण्यात आले. "हा आनंदाचा दिवस आहे," असे फडणवीस म्हणाले. त्यांनी कर्णधार रोहित शर्माचे विशेष कौतुक केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली.

रोहित शर्माची निवृत्ती-

फडणवीस पुढे म्हणाले, "कर्णधार रोहित शर्माने आपल्याला एकाच दिवशी आनंद आणि दु:ख दोन्ही दिले. विश्वचषक जिंकून आनंद दिला आणि निवृत्ती घेऊन दु:ख दिले. रोहित शर्मा हा खेळाडू इतिहासात मोठ्या खेळाडूंच्या मांदियाळीत असेल." कपिल शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीनंतर रोहित शर्माने आपल्याला विश्वचषक जिंकवून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

रोहित शर्माचे विक्रम-

रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम आहेत. टी २० मधील तो यशस्वी कर्णधार आहे. कर्णधार म्हणून त्याने मिळवलेला विश्वास आणि त्याची नेतृत्व क्षमता भारतीय क्रिकेटसाठी अनमोल ठरली आहे. फडणवीसांच्या मते, राजकारण्यांनी रोहितकडून नेतृत्वाचे धडे शिकायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT