Rohit Sharma Should Be Loss The Toss On Adelaide oval  esakal
क्रीडा

Rohit Sharma : टॉस का बॉस रोहित अॅडलेडवर मात्र टॉस हरावा कारण..

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England Rohit Sharma Toss : भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबरला टी 20 वर्ल्डकप 2022 मधील दुसरा सेमी फायनल सामना रंगणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हलवर होत आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा सुपर 12 मध्ये टॉस का बॉस राहिला आहे. त्याने पाच सामन्यापैकी चार सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. मात्र सेमी फायनलमध्ये रोहित शर्मा नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागू नये अशी प्रार्थना करत असेल. मात्र अॅडलेडवर भारत नाणेफेक का गमावू इच्छितो, अॅडलेड ओव्हलचा इतिहास काय सांगतोय?

टॉस जिंकणारा हरतो

भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबरला अॅडलेडवर टी 20 वर्ल्डकप 2022 ची सेमी फायलन होणार आहे. या मैदानावरील नाणेफेकीसंदर्भातील आकडेवारी खूपच गंमतीशीर आहे. सध्याच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये या मैदानावर आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत. मात्र सामना त्याच संघाचे जिंकला आहे त्याने नाणेफेक गमावली आहे. भारताने देखील यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील एक सामना अॅडलेडवर खेळला आहे.

भारताने बांगलादेशविरूद्धचा सामना या मैदानावर खेळला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सामन्यात नाणेफेक जिंकणारा रोहित शर्मा नेमका या सामन्यात नाणेफेक हरला होता. प्रत्येकवेळी सेमी फायलन सारख्या मोठ्या आणि नॉक आऊट सामन्यात प्रत्येक कर्णधार नाणेफेक जिंकण्यासाठी प्रार्थना करत असतो. मात्र अॅडलेडवरील इंग्लंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात दोन्ही कर्णधार नाणेफेक हरण्यासाठी प्रार्थना करत असतील.

सरावादरम्यान रोहितला दुखापत

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इंग्लिश वेगवान मारा हे भारतासाठी मोठे आव्हान असणार आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी रोहित शर्मा थ्रोडाऊनवर फलंदाजी करत होता. यादरम्यान, त्याच्या हाताला चेंडू लागला. रोहितला चांगल्याच वेदना होत होत्या. त्यानंतर त्यांने नेटमधून बाहेर जात आपल्या दुखऱ्या हातावर उपचार करून घेतले. त्यानंतर त्याने आपला सराव सत्र देखील संपवले. रोहित शर्माची दुखापत फारशी गंभीर नसल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT