Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला रोहितची अनुपस्थितीत; हैदराबादमध्ये पोहचून केला सराव?

विराट अन् जडेजा अयोध्येत पोहचले मात्र रोहित हैदराबादमध्ये संघासोबत...

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Ram mandir consecration ceremony : भारताचा कर्णधार रोहित शर्माला अयोध्येतील राम मंदिरातील रामल्ललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पोहचले होते. मात्र रोहित शर्माने अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याचं टाळलं. रोहित शर्मा आज सकाळी राजीव गांधी स्टेडियममध्ये सराव केला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा हैदराबाद येथे 25 जानेवारी रोजी होणार आहे. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर रविवारी रात्री हैदराबादमध्ये दाखल झाले. ते सोमवारी इन डोअर स्टेडियममध्ये सराव करणार होते.

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली रविवारीच अयोध्येत दाखल झाला होता. त्याने आज राम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावली. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा देखील या सोहळ्याला उपस्थित होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ मायदेशातील विजयी घोडदौर कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारताने 2012 पासून भारतात कसोटी मालिका गमावलेली नाही. 2012 मध्ये इंग्लंडनेच भारताचा भारतात पराभव केला होता.

भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान.

इंग्लंडचा कोसटी संघ :

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्राऊली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्ट्ली, जॅक लिच, ओली पॉप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वूड.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT