क्रीडा

Rohit Sharma WI vs IND : मी कधीही विचार केला नव्हता... रोहितनं सांगितलं बॅटिंग ऑर्डर बदलण्याचे कारण

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma WI vs IND : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आतापासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे भारताने विंडीजवर विजय मिळवत मालिकेची दमदार सुरूवात केली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत वेस्ट इंडीजला 23 षटकात 114 धावात गुंडाळले. मात्र हेच आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांना देखील घाम फुटला.

भारताचा निम्मा संघ 97 धावात गारद झाला. अखेर रोहित शर्माला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले अन् सामना संपवावा लागला. रोहित शर्माने आजच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत अनेक बदल केले होते.

मात्र हे बदल फारसे फळास आले नाहीत. अखेर रोहित शर्माने सामन्यानंतर आपल्या या बदलाबद्दल माहिती दिली.

रोहित शर्मा सामना झाल्यावर म्हणाला की, 'मी खेळपट्टी अशी खेळेल याची कल्पनाच केली नव्हती. संघाची गरज होती म्हणून आम्ही गोलंदाजी केली. ही खेळपट्टी वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांना मदत करणारी होती. आमच्या खेळाडूंनी चांगली गोलंदाजी करत त्यांना 114 धावात रोखले.'

रोहित बॅटिंग ऑर्डरमध्ये केलेल्या मोठ्या बदलाबद्दल म्हणला की, 'आमच्या वनडे खेळण्याऱ्या खेळाडूंना जास्त सराव व्हावा अशी आमची इच्छा होती. आम्हाला संधी मिळाली तर आम्ही अशा प्रकारे बदल करत राहू.'

'ज्यावेळी आम्ही त्यांना 115 धावात रोखले त्यावेळी आम्हाला माहिती होते की या खेळाडूंनी आम्ही फलंदाजीत वरच्या क्रमांकावर खेळवू शकतो. मला नाही वाटत की त्यांना अशा प्रकारची संधी फार मिळत असेल.'

कर्णधार पुढे म्हणाला, 'मी भारताकडून पदार्पण केले त्यावेळी सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मला आज त्या दिवसांची आठवण झाली. मुकेश कुमारने चांगली गोलंदाजी केली. तो चांगली गती राखत चेंडू स्विंगही करतोय. त्याची गुणवत्ता पाहून चांगले वाटले. त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये फार पाहिले नव्हते.'

'खेळपट्टी कशीही असो तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांना रोखायला चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागते. मला वाटते की आमच्या गोलंदाजांनी ते चांगल्या प्रकारे केले. याचबरोबर इशान किशनने देखील चांगली फलंदाजी केली.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT