Rohit Sharma Statement after defeat against england marathi news sakal
क्रीडा

Ind vs Eng : पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाला कोण जबाबदार? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

India vs England Test Series News 2024 : सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

India vs England 1st Test :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नाराज दिसला. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्या डावात 190 धावांची आघाडी मिळाली असतानाही 28 धावांनी सामना गमवावा लागला होता.

या पराभवासह टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला विजयासाठी फक्त 231 रन्सचं टार्गेट होतं, पण भारतीय टीम 202 रन्सवर ऑलआऊट झाली. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

रोहितने पराभवासाठी कोणाला जबाबदार धरले?

सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला की, हा सामना चार दिवस खेळला गेला, त्यामुळे कुठे चुका झाल्या हे सांगणे कठीण आहे. 190 धावांची आघाडी मिळाल्यानंतर आम्हाला वाटले की आम्ही खेळात खूप पुढे आहोत. पण भारतीय या परिस्थितीत ओली पोपने शानदार खेळी खेळली. मला वाटले होते की आम्ही 230 धावा करू शकतो, खेळपट्टीवर फारसे काही नव्हते. धावसंख्या गाठण्यासाठी आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. सिराज आणि बुमराहने पाचव्या दिवशी खेळ घेऊन जावा अशी माझी इच्छा होती. खालच्या ऑर्डरने तिथे खरोखरच चांगली फंलदाजी केली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, हैदराबाद कसोटीत इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर टीम इंडिया दुसऱ्या डावात 202 धावांवर ऑलआऊट झाली. दुसऱ्या डावात इंग्लंडने शानदार फलंदाजी करत 420 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडकडे 231 धावांची आघाडी होती.

टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली. टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या. टॉम हार्टलीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता. या सामन्याच्या दोन्ही डावात टॉम हार्टलेने 9 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT