Rohit Sharma Asia Cup 2023 esakal
क्रीडा

Rohit Sharma : या स्पर्धेत आम्ही सर्व काही... आशिया कपच्या विजयानंतर कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Asia Cup 2023 : भारताने यंदाच्या आशिया कपमध्ये बांगलादेशविरूद्धचा पराभव सोडला तर उत्तम कामगिरी केली आहे. भारताने फलंदाजी, फिरकी गोलंदाजी आणि आता वेगवान गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली. भारताने श्रीलंकेचा 10 विकेट्स राखून पराभव करत आशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं.

आजच्या फायनल सामन्यात मोहम्मद सिराजने 21 धावात 6 विकेट्स घेत लंकेची टॉप ऑर्डर उडवली. रोहित सिराजच्या कामगिरीवर जाम खूष झाला होता.

भारताने आशिया कपवर आठव्यांदा कब्जा केल्यानंतर रोहित शर्मा समालोचकांशी बोलताना म्हणाला, 'ही खूप ग्रेट कामगिरी होती. फायनलमध्ये अशा प्रकारे कामगिरी करणे हे तुमची मानसिक ताकद दर्शवते. आम्ही चांगली गोलंदाजी करत सुरूवात केली आणि फलंदाजीतही दमदार कामगिरी करत सामना संपवला.'

'मी स्लिपमध्ये उभा राहून पाहत होतो की आमचे वेगवान गोलंदाज किती कष्ट करत होते. त्यांचे विचार एकदम स्पष्ट होते. अशी कामगिरी खूप दीर्घकाळ लक्षात राहते. या सामन्यात अशी कामगिरी होईल याचा विचार आम्ही केला नव्हता.'

रोहित पुढे म्हणाला की, 'वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर सिराजला सर्व श्रेय द्यावं लागेल. एखादा वेगवान गोलंदाज हवेतही स्विंग करतो आणि ऑफ द पिच देखील स्विंग करण्याची क्षमता ठेवतो हे दुर्मिळ असतं. तो चांगलाच परिपरक्व होत आहे.'

'आम्ही या स्पर्धेत एक संघ म्हणून जे काही साध्य करण्यासाठी आलो होतो ते सर्व साध्य केलं आहे. आता आम्ही भारतातील मालिकेचा आणि वर्ल्डकपचा विचार करत आहोत. ज्या प्रकारे हार्दिक आणि इशान किशनने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात दबावात फलंदाजी केली.'

'त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने शतकी खेळी केली. ज्या प्रकारे गिलने फलंदाजी केली. खेळाडूंनी वेगवेगळ्या परिस्थितीत आपली प्रतिभा दाखवून दिली.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुणे आणि राज्यात 'थंडी'ची चाहूल; मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाड्यातही पारा खाली

Uddhav Thackeray: शेतकरी उद्‌ध्वस्त, सरकारकडून विकासाच्या गप्पा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; बार्शी तालुक्यातील घारीत शिवसेनेचा संवाद दौरा

Jalgaon Bus Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्स बस अन् टॅंकरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , ७ गंभीर जखमी

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

SCROLL FOR NEXT