Rohit Sharma On Pitch esakal
क्रीडा

Rohit Sharma On Pitch : अशा खेळपट्टीवर खेळायला अडचण नाही फक्त भारतात आल्यावर... रोहित शर्माचं कडक उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma On Pitch : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. केप टाऊनच्या खेळपट्टीबाबत ना विदेशी मीडिया ना भारतात फार काही बोलण्यात आलं. मात्र या खेळपट्टीवर पहिल्या दिवशीच 23 विकेट्स पडल्या होत्या.

या कसोटीत अवघ्या 108 षटकांमध्ये 33 विकेट्स पडल्या अन् 642 धावा झाल्या आहेत. दरम्यान, सामना झाल्यानंतर रोहितने खेळपट्टीबाबत वक्तव्य केलं. त्याने आपल्या वक्तव्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांना चांगलाच टोला लगावला.

रोहित म्हणाला, 'मला अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळायला काहीच अडचण नाही. फक्त सर्वांनी भारतात आल्यावर आपलं तोंड बंद ठेवायला हवं. त्यावेळी तुम्ही भारतीय खेळपट्ट्यांबाबत तक्रार करू नये. तुम्ही इथे स्वतःला आव्हान देता. ज्यावेळी लोकं भारतात येतात त्यावेळी त्यांना तिथली परिस्थिती आव्हानात्मक असते.'

वनडे वर्ल्डकपची फायनल अहमदाबादमध्ये झाली होती. ती खेळपट्टी संथ आणि चेंडू कमी उसळी घेणारी होती. त्या खेळपट्टीला आयसीसीने सुमार दर्जा दिला होता. भारतातील प्रत्येक कसोटी सामन्यात खेळपट्टीची जोरदार चर्चा होत असते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही संघ भारतात कसोटीत फिरकीसमोर ढेपाळतात.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय थलापती यांच्या मोठ्या घोषणा; 'या' फाईलवर केली पहिली सही

Mumbai: मुंबईत आरबीआय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारणार, २१० झाडांची कत्तल होणार; पर्यावरणप्रेमींची टीका

‘दंड भरावा लागेल’; वाहतूक पोलिसांनी पाकिस्तानच्या क्रिकेटरला रस्त्यातच थांबवलं Video Viral

Latest Marathi News Live Update: रुपाली चाकणकरांच्या चौकशीला सुरुवात

Nanded News: मॉन्सूनपूर्व नालेसफाईला प्रारंभ;आयुक्त डॉ. डोईफोडे यांची विविध भागांत पाहणी

SCROLL FOR NEXT