Rohit Sharma Surpasses Virat Kohli MS Dhoni Became Fastest T20I 1000 Runs As Captain Of India esakal
क्रीडा

Rohit Sharma |धोनी अन् विराटवर 'कॅप्टन' रोहित पडला भारी; केला मोठा विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

साऊथहॅम्पटन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. रोहित शर्माने 16 चेंडूत 24 धावा केल्या. आपल्या या छोट्या पण आक्रमक खेळीत रोहितने पाच चौकार लगावले. याचबरोबर रोहितने कर्णधार म्हणून टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. टी 20 क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करताना 1000 धावा करणारा रोहित तिसरा भारतीय कर्णधार ठरला. तसेच रोहितने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यापेक्षा कमी डाव खेळून 1000 धावा केल्या. (Rohit Sharma Surpasses Virat Kohli MS Dhoni Became Fastest T20I 1000 Runs As Captain Of India)

रोहित शर्माने 28 टी 20 सामन्यात कर्णधारपद भुषवले. रोहित व्यतिरिक्त धोनीने 72 सामन्यात 1112 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने 50 सामन्यात कॅप्टन्सी करत 1570 धावा केल्या आहेत.

भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने फलंदाजी करताना दमदार 51 धावांची अर्धशतकी खेळी केली तर गोलंदाजीत 33 धावात 4 विकेट घेतल्या. हार्दिकच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. हार्दिकला गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि पदार्पण करणाऱ्या अर्शदीपने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. या सर्वांनी मिळून इंग्लंडचा डाव 148 धावात संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT