Rohit Sharma twitter account may hack  ESAKAL
क्रीडा

रोहित शर्माचे ट्विटर अकाऊंट हॅक? असंबंध ट्विट्सची मालिका

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून आज ( दि. 1 मार्च) काही असंबंध ट्विट्स शेअर करण्यात आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नुकतेच भारतीय संघाने श्रीलंकेला टी 20 मालिकेत 3-0 असा व्हाईट वॉश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटूंचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल पांड्या आणि ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सनचे देखील ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते.

याबाबत एका चाहता रोहितच्या ट्विटर अकाऊंटचे फोटो शेअर करत म्हणाला की रोहित शर्माचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. त्याचे बाकीचे ट्विट्स हे आयफोनवरून केले होते. तर आताच करण्यात आलेले असंबंध ट्विट्स हे ट्विटर डेकवरून करण्यात आले आहेत.

तर दुसऱ्या एका चाहत्याने भारताचा क्रमांक एकच्या खेळाडूचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. नव्या युगात तुमचे स्वागत आहे असे ट्विट करून रोहित शर्माचे ट्विटर अकाऊंट हॅक होण्यावरून चिमटा काढला.

रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याने वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्याविरूद्धची टी 20 मालिका 3-0 अशी जिंकली. त्याने दोन्ही संघांना व्हाईट वॉश दिला. विशेष म्हणजे रोहित शर्माने या मालिकेत केलेले गोलंदजातील आणि टीम कॉम्बिनेशनमधील बदलाची चर्चा झाली. रोहित शर्माने या मालिकेत ऑस्ट्रेलियातील आगामी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेवर नजर ठेवून संघ बांधणीसाठी कंबर कसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT