rohit sharma viral video steve smith wicket 
क्रीडा

Rohit Sharma : ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वात्रटपणावर रोहितची रिएक्शन, एकदा व्हिडिओ पाहाच

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...

Kiran Mahanavar

Rohit Sharma Viral Video Steve Smith Wicket : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेलेला मालिकेतील पहिला टी-20 सामन्याट टीम इंडियाचा पराभव झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब झाली. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हरामीपणाकडे बोट दाखवताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 12व्या षटकात स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उमेश यादवने त्याला बाद केले. स्टीव्ह स्मिथने या षटकात विकेटच्या मागे दिनेश कार्तिककडे त्याचा झेल दिला, पण अंपायरने त्याला आऊट दिले नाही. पंचांच्या नॉटआऊट निर्णयावर टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला. चेंडू स्मिथच्या बॅटला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. त्यानंतरही स्टीव्ह स्मिथ यावर विश्वास ठेवत नव्हता. हा प्रसंग पाहून कॅप्टन रोहितने त्याच्याकडे बोट दाखवले आणि हसायला लागला. रोहितच्या या हावभावाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

स्टीव्ह स्मिथने या सामन्यात 24 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याच्या बॅटने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 71 धावा, तर केएल राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 46 धावा केल्या. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने 61 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT