Roll Ball World Cup sakal
क्रीडा

Roll Ball World Cup : भारताची विजयी सलामी; पोलंडवर एकतर्फी मात

महिला गटात इजिप्त संघाने नेपाळ संघाला ३-० असे हरविले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहाव्या वरिष्ठ गटाच्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेत पुरुषांमध्ये भारतीय संघाने पोलंडला हरवून विजयी सलामी दिली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत पुरुषांच्या गटात भारतीय संघाने पोलंड संघाला १४-१ अशा फरकाने पराभूत केले.

मध्यंतरालाच भारतीय संघाने ८-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून आकाश गणेशवाडेने चार, हर्षल घुगे, सचिन सैनीने प्रत्येकी दोन तर मिहीर साने, श्रीकांत साहू, विकी सैनी, आदित्य सुतार, गुरुवचनसिंग व टी. प्रदीपने प्रत्येकी एक गोल केला. पोलंड संघाकडून एकमोव गोल रडदिया सत्यमने केला.

या स्पर्धेचे उद्घाटन उच्चतंत्र व शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, राजू दाभाडे, मंजुश्री खर्डेकर, ज्योती कळमकर हे उपस्थित होते.

महिला गटात इजिप्तचा विजय

महिला गटात इजिप्त संघाने नेपाळ संघाला ३-० असे हरविले. मध्यंतरालाच इजिप्त संघाने ३-० अशी आघाडी घेतली होती. इजिप्तच्या मुस्तफा रीतीजने तीन ही गोल केले. नेपाळ संघाचे खेळाडू मात्र गोल करण्यात अपयशी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT