Babar Azam  esakal
क्रीडा

Babar Azam : संघापासून बाबरला केलं वेगळ; पाकिस्तान संघात लागलं भांडण; हाणामारीपर्यंत पोहचलं प्रकरण?

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam : भारताविरूद्धचा सामना हरल्यापासून पाकिस्तान संघासाठी कोणताही गोष्ट व्यवस्थित होत नाहीये. त्यांना ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना गमवावा लागला. याचबरोबर बालिश वक्तव्यांमुळे टीका देखील झाली.

आता तर अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघात तुफान राडेबाजी झाली असल्याचे वृत्त आले होते. या वृत्तात वादावादी हाणामारीत रूपांतरित झाली असल्याचेही सांगण्यात आले. बाबर आझमला तर काही खेळाडूंच्या समुहापासून वेगळं ठेवलं असल्याचं सांगण्यात आलं.

मात्र आता यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. यात या सर्व अफवा असून संघात असं काहीही झालं नसल्याचं सांगितलं.

पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की पाकिस्तान संघात भांडण झालं आहे. याबाबतची अधिक माहिती ते अफगाणिस्तान सामन्यानंतर देतील असे आश्वासनही त्यांनी दिले.

या पोस्टनुसार दोन खेळाडूंमध्ये भांडण झालं अन् ते भांडण हाणामारीपर्यंत गेलं. संघात दुफळी वाढत आहे. संघातील काही खेळाडूंनी बाबर आझमला एकटं पाडलं आहे.

यानंतर पीसीबीने त्वरित एक छोटेखानी पत्रक काढलं आणि ते ट्विट केलं. यात पीसीबी म्हणते, 'देशाच्या संघात दुफळी असल्याचे वृत्त खोटं आहे. माध्यमांमधील काही लोकांनी ही अफवा पसरवली आहे.'

'पीसीबी सांगू इच्छिते की संघ एकसंध आहे. माध्यमात आलेल्या वृत्ताला कोणत्याही पुराव्याचा आधार नाही. या खोट्या वृत्तावर पीसीबी नाराज आहे आणि सर्वांना पत्रकारितेच्या मुल्यांचे पालन करणं खूप गरजेचं आहे.'

पाकिस्तानने भारतातील वर्ल्डकपची सुरूवात सलग दोन विजयाने केली होती. त्यांनी नेदरलँड्स आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर भारताने आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. यामुळे ते सध्या टॉप 4 संघाच्या रेसमधून बाहेर फेकले गेले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT