Shane Warne esakal
क्रीडा

युक्रेनवरील हल्ला अन्यायकारक, संपूर्ण जग पाठिशी : शेन वॉर्न

सकाळ डिजिटल टीम

रशियाकडून सातत्यानं होत असलेलं आक्रमण पाहता अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia And Ukraine War) यांच्यात वाद चालू होता व या वादाचा परिणाम आता युद्धामध्ये झालेला पाहायला मिळत आहे. हल्ली दोन्ही देशांत तणावाची स्थिती निर्माण झालीय. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या युद्धावर जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननंही आपली प्रतिक्रिया दिलीय. शेन वॉर्ननं (Shane Warne) युक्रेनच्या बाजूनं संदेश लिहून रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचं म्हंटलंय.

वॉर्ननं ट्विटव्दारे युक्रेनचं समर्थन केलंय. रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची आणि अन्यायकारक असल्याचंही त्यानं म्हटलंय. शेन वॉर्न पुढे लिहितो, संपूर्ण जग युक्रेन लोकांच्या पाठीशी आहे. कारण, रशियन सैन्यानं युक्रेनवर अन्यायकारक हल्ला केलाय आणि यात अनेक नागरिकांचा बळी गेलाय. सध्या युक्रेनमधील चित्रं भयावह आहे. पण, हे युध्द थांबवण्यासाठी काहीही केलं जात नाहीय. याच आश्चर्य वाटतंय. शेवटी त्यानं युक्रेनियन मित्र आंद्रे शवचेंको याच्यासोबतच प्रेम व्यक्त केलंय.

रशियाकडून सातत्यानं होत असलेलं आक्रमण पाहता अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. UEFA चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना मे महिन्यात सेंट पीटर्सबर्ग येथे खेळवला जाणार होता; पण आता तो तिथून हलवण्यात आलाय. आता हा सामना 28 मे रोजी पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स (Stade De France Stadium) येथे खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स लीग व्यतिरिक्त रशियन ग्रँड प्रिक्सचा (Russian Grand Prix) हंगाम देखील रद्द करण्यात आलाय. यासोबतच क्रीडाविश्वातील लोक एकजुटीनं आवाज उठवत आहेत. रशियात होणार्‍या क्रीडा स्पर्धांचं आयोजन रशियाबाहेर हलवण्याची मागणी करत आहेत. तर, अनेक खेळाडूंनी हे युद्ध थांबवण्याची मागणीही केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT