Russia banned from Olympics for third time Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : ऑलिंपिकमध्ये रशियाला सलग तिसऱ्यांदा प्रवेश बंदी

Paris Olympic 2024 latest news in marathi | पॅ रिस ऑलिंपिकमध्ये जगभरातून खेळाडू आले आहेत; पण फ्रान्सनं रशिया आणि बेलारूस या दोन देशांना मात्र ऑलिंपिकचं निमंत्रणच पाठवलं नाही.

सकाळ वृत्तसेवा

- रोहिणी गोसावी

पॅरिस ऑलिंपिकमध्ये जगभरातून खेळाडू आले आहेत; पण फ्रान्सनं रशिया आणि बेलारूस या दोन देशांना मात्र ऑलिंपिकचं निमंत्रणच पाठवलं नाही. त्यामुळे रशियाला सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.

याआधी त्यांचे खेळाडू उत्तेजक चाचणींत दोषी सापडल्यामुळे निलंबित करण्यात आले होते; पण पॅरिस ऑलिंपिकमध्ये मात्र रशिया आणि युक्रेन युद्धामुळे रशियाला आणि रशियाचा जवळचा मित्रदेश बेलारूस यांना ऑलिंपिकचं निमंत्रणच दिलं गेलं नाही.

मात्र, या देशांना नसलं तरीही फ्रान्सकडून रशियाच्या ३६ आणि बेलारूसच्या १८ खेळाडूंना वैयक्तिक सहभागासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकी रशियाचे १५ खेळाडू आणि बेलारूसचे १७ खेळाडू पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होत आहेत.

रशिया-युक्रेनच्या युद्धात फ्रान्स युक्रेनला पाठिंबा देतंय. रशियाविरुद्ध लढण्यासाठी फ्रान्सने युक्रेनला शस्रसाठाही पुरवलाय. त्यामुळे साहजिकच रशिया आणि फ्रान्समध्ये तणावाचे संबंध आहेत.

ऑलिंपिक ही जागतिक दर्जाची स्पर्धा असली तरीही फ्रान्स रशियाला या सगळ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतेय. रशियन सरकार मात्र वेगळाच कांगावा करत आहे. आमच्या काही खेळाडूंना तुमच्याकडे खेळायचे नाहीये म्हणून त्यांनी स्वत:च फ्रान्सचं निमंत्रण नाकारलं, असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही काही खेळाडूंकडून निमंत्रणाला उत्तर आलेलं नाही.

खेळाडूंचा वैयक्तिक सहभाग, राष्ट्रध्वजाला परवानगी नाही

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्या देशांवर बंदी येते; पण त्यांचे खेळाडू वैयक्तिक सहभाग घेतात अशा खेळाडूंना Individual Nuetral Athelets (INA) असं म्हणतात. त्यामुळे रशियाचे खेळाडूही याच गटातून सहभागी झालेत. त्यांना रशियाचा राष्ट्रध्वज किंवा रशियाचे प्रतिनिधित्व करणारी कोणतीही गोष्ट स्वत:जवळ बाळगण्याची परवानगी नाही.

तसेच, ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभात होणाऱ्या परेड ऑफ नेशन्समध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही, कारण ते कोणत्याही देशाचं प्रतिनिधित्व करीत नाहीत आणि त्यांनी जर पदके जिंकली तर ती त्यांच्या देशाच्या नावावर जमा न होता, त्यांच्या वैयक्तिक नावांवर जमा होतील. त्यांच्या देशाचा ध्वजही कोठेच फडकवला जाणार नाही.

जगज्जेते रशियन्स

एकेकाळी ऑलिंपिक आणि इतरही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकणारा देश अशी ओळख असलेला रशियाचा अशा स्पर्धांतून निलंबित होण्याचा प्रवास जगभरातील खेळाडूंसाठी चांगलाच धडा आहे. गेली अनेक वर्षे रशियाचे खेळाडू त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही उत्तेजक घेतात, त्यामुळे अनेकदा काहींना तात्पुरते तर काहींना दीर्घकाळासाठी निलंबित करण्यात आलेले आहे; पण २०१६च्या ऑलिंपिंकमध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर रशियाच्या सगळ्याच खेळाडूंना निलंबित करण्यात आलं होतं.

देशभक्त खेळाडूंना टाळलं

फ्रान्सने वैयक्तिक खेळाडूंना निमंत्रण देतानाही जे खेळाडू रशिया- युक्रेनच्या युद्धात उघडपणे रशियाला पाठिंबा देतात आणि युक्रेनला विरोध करतात अशा खेळाडूंना निमंत्रण दिलेलं नाही. तसेच जे खेळाडू रशियन सैन्यात आहेत, त्यांनाही या स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: सुरतमध्ये अपहरण, मुंबईत संपवलं; पण कुणी? कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात सापडलेल्या ५ वर्षीय मुलाच्या मृतदेहाचं कोडं उलगडलं

'Vaibhav Suryavanshi ला फार सल्ले द्यायला जाऊ नका...', रायुडू असं का म्हणाला? वाचा

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Palghar News: भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT