Russian player Daniil Medvedev in the second round radukanus debut opener victory paris
Russian player Daniil Medvedev in the second round radukanus debut opener victory paris  sakal
क्रीडा

मेदवेदेव, स्वीयतेकची विजयी वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव व पोलंडची इगा स्वीयतेक यांनी फ्रेंच ओपन या मानाच्या टेनिस स्पर्धेतील शनिवारचा दिवस गाजवला. मेदवेदेव याने मिओमिर केकमॅनोविच याला पराभूत केले, तर स्वीयतेकने माँटेनेग्रोच्या डांका कोविनीच हिला नमवले. दुसरा मानांकित मेदवेदेवच्या जबरदस्त खेळासमोर केकमॅनोविचचा निभाव लागला नाही. मेदवेदेव याने केकमॅनोविचवर ६-२, ६-४ व ६-२ अशा फरकाने विजय मिळवला. मेदवेदेव याने ही लढत १ तास व ४८ मिनिटांमध्ये जिंकली. नंबर वन स्थानावरील स्वीयतेक हिने कोविनीच हिला ६-३, ७-५ अशा फरकाने अगदी सहज हरवले. एक तास व ३० मिनिटांमध्ये तिने हा विजय साकारला.

रोहन-मिडलकूपचा थरारक विजय

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना व त्याचा साथीदार मॅटवे मिडलकूप या जोडीने शनिवारी विम्बल्डन विजेत्या जोडीवर थरारक विजय मिळवला. बोपन्ना-मिडलकूप या जोडीने पाच मॅच पॉईंट वाचवून हा सामना जिंकला हे विशेष. बोपन्ना-मिडलकूप ही जोडी पहिल्या सेटमध्ये ६-७ अशा फरकाने पराभूत झाली. यानंतर मात्र बोपन्ना-मिडलकूप या दोघांनीही दबावाखाली आपला खेळ उंचावला. पुढील दोन सेट या जोडीने ७-६, ७-६ अशा फरकाने जिंकत आगेकूच केली.

सबालेंका हरली, रुबलेव जिंकला

बेलारुसच्या ए. सबालेंका हिला इटलीच्या कॅमिला जिऑर्जी हिच्याकडून हार सहन करावी लागली. इटलीच्या टेनिसपटूने सबालेंका हिचे कडवे आव्हान ४-६, ६-१, ६-० अशा फरकाने परतवून लावत महिला एकेरीत पुढे पाऊल टाकले. सातव्या मानांकित आंद्रेय रुबलेव याला विजयासाठी संघर्ष करावा लागला. पण दबावाखाली त्याने अव्वल दर्जाचा खेळ केला. त्याने चिलीच्या ख्रिस्तीयन गरीन याच्यावर ६-४, ३-६, ६-२, ७-६ अशा फरकाने विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT