Russian wrestlers Refusal to compete in paris olympics Sakal
क्रीडा

Paris Olympics: ऑलिंपिकमध्ये खेळण्यास रशियन कुस्तीपटूंचा नकार

युक्रेनवर युद्ध करत असलेल्या रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर निर्बंध आहेत. ते आपल्या देशांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : या महिना अखेरीस सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देण्यात आलेले निमंत्रण रशियाच्या विख्यात कुस्तीपटूंनी नाकारले आहे. रशियन अॅथलीट या ऑलिंपिक स्पर्धेत त्रयस्त देशाचे खेळाडू म्हणूनच सहभागी होऊ शकतात.

युक्रेनवर युद्ध करत असलेल्या रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर निर्बंध आहेत. ते आपल्या देशांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. त्यांना सहभागी व्हायचे असेल तर त्रयस्त देशाचे खेळाडू म्हणून राहावे लागेल. तसेच उद्घाटनामध्ये रशिया किंवा बेलारूसचा राष्ट्रध्वजही नसेल.

दोन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या अब्लुलरशिद सादुलेव आणि २०२३ मधील विश्वविजेता झुब्रेक सिदाकोव या रशियाच्या दिग्गज कुस्तीपटूंचा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही, असे रशिया कुस्ती फेडरेशनकडून जाहीर करण्यात आले.

आमच्या खेळाडूंनीच नव्हे तर प्रशिक्षक टीमनेही ऑलिंपिकमध्ये जाण्यास नकार दिला आहे. खिलाडूवृत्ती नसलेले असे निमंत्रण आम्ही स्वीकारणार नाही. जेव्हा तुम्ही असे खेळाडू निवडता तेव्हा त्यांना त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे महत्त्वाचे असते, असेही रशिया कुस्ती फेडरेशनने म्हटले आहे.

गेल्या महिन्यात रशियाचा विख्यात सायकलपटू अलेक्सांडर वालसोव यानेही ऑलिंपिकमधून माघार घेतलेली आहे. पॅरिसमध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा २६ जुलैपासून सुरू होत आहे आणि ५ ऑगस्टपासून कुस्तीचे सामने होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT