Ruturaj Gaikwad Video Viral sakal
क्रीडा

VIDEO : ड्रायव्हरने मराठमोळ्या ऋतुराजला टीम इंडियाच्या बसमध्ये दिली नाही एंट्री? आधी नेमकं काय घडलं जाणून घ्या

Kiran Mahanavar

South Africa vs India Ruturaj Gaikwad Video Viral : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडचा आहे. ऋतुराज बसमध्ये चढण्यासाठी जातो, मात्र ड्रायव्हरने दरवाजा बंद केला. ज्यावर सोशल मीडिया यूजर्सकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या.

वास्तविक, X वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड बसमध्ये बसण्यासाठी जात आहे, पण दरवाज्या अचानक बंद झाला. हा व्हिडिओ फक्त 10 सेकंदांचा आहे. मात्र, पुढील काय झाले. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर काही युजर्सनी दावा केला आहे की, ऋतुराजला बसमध्ये बसू दिले नाही.

जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 116 धावा करू शकला.

भारताने 117 धावांचे लक्ष्य 2 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात ऋतुराज काही विशेष करू शकला नाही. तो टीम इंडियासाठी सलामीला आला होता. यादरम्यान तो 10 चेंडूंचा सामना करून 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT