Ruturaj Gaikwad | WI vs IND Tests Squad SAKAL
क्रीडा

Team India : टीम इंडियात CSKचा 'कोटा?', ऋतुराजच्या निवडीमुळे क्रिकेट वर्तुळात रंगली चर्चा

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऋतुराजची कामगिरी अलीकडच्या काळात काही विशेष राहिलेली नाही तरीही...

Kiran Mahanavar

Ruturaj Gaikwad WI vs IND Tests Squad 2023 : सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. ऋतुराजला कसोटी संघात समावेश करण्यावर लोकांनी आता प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऋतुराजची कामगिरी अलीकडच्या काळात काही विशेष राहिलेली नाही.

अशा परिस्थितीत लोक सोशल मीडियावर ऋतुराजला ट्रोल करत आहेत. सरफराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि प्रियांक पांचाल यांच्यासोबत हा प्रकार चुकीचा झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ऋतुराजसाठी या खेळाडूंकडे टीम इंडियाने दुर्लक्ष केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

ऋतुराज गायकवाड यांच्या निवडीवरून क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. लोक म्हणतात की ऋतुराजचा अलीकडचा रेकॉर्ड बघून त्यांची निवड झाली का? देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या धावा करणारा सरफराज खानवर पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराज गेल्या दोन मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

बांगलादेश दौऱ्यावर आणि बॉर्डर गावसकर मालिकेसाठीही त्याला कसोटी संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर लोकांनी निवडकर्त्यांना चांगले झापले होते. विंडीजविरुद्ध त्याला नक्कीच संधी मिळेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही.

सर्फराजला कसोटी संघात नसताना पाहून सोशल मीडियावर लोक संतापले. अनेकांनी बीसीसीआयवर भेदभावाचा आरोप केला, तर अनेकांचे म्हणणे आहे की ऋतुराजची निवड सीएसकेच्या कोट्याच्या आधारे करण्यात आली आहे. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.

अभिमन्यू ईश्वरनने 2023 मध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत. असे असतानाही त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघातही स्थान मिळाले नाही. ईश्वरनने अलीकडेच शेष भारताविरुद्धच्या सामन्यात 154 धावांची संस्मरणीय खेळी खेळली. दुसऱ्या डावात त्याने 28 धावा केल्या. याआधी त्याने बंगालसाठी ओडिशाविरुद्ध 101 धावा केल्या होत्या, तर उत्तराखंडविरुद्ध पहिल्या डावात 165 आणि दुसऱ्या डावात नाबाद 82 धावा केल्या होत्या. नागालँडविरुद्ध त्याच्या बॅटमधून 170 धावांची खेळी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT