ruturaj gaikwad
ruturaj gaikwad sakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad : पुण्याच्या ऋतुराजचं काय चुकतंय; संघात स्थान पण प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही

Kiran Mahanavar

Ruturaj Gaikwad India vs Zimbabwe 3rd ODI : भारतीय संघाने झिम्बाब्वे विरुद्धची मालिका आधीच जिंकली आहे. अशा स्थितीत कर्णधार केएल राहुलने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. त्याने दीपक चहर आणि आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. उत्कृष्ट फॉर्म असूनही एक खेळाडू बेंचवर बसला आहे. या खेळाडूला झिम्बाब्वे दौऱ्यावर फक्त एक पर्यटक म्हणून घेऊन गेले आहे. अशा स्थितीत या खेळाडूच्या कारकिर्दीला ग्रहण लागलेले दिसत आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या खेळाडूमध्ये कोणत्याही गोलंदाजीचे आक्रमण मोडून काढण्याची क्षमता आहे. ऋतुराज गायकवाडने टीम इंडियासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याने चेन्नई संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाड संघाला दमदार सुरुवात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत, ऋतुराज गायकवाड सर्व सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळला.

ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले होते, परंतु आयपीएल 2022 मध्ये तो करिश्माची पुनरावृत्ती करू शकला नाही. तरीही निवडकर्त्यांनी त्याला टीम इंडियाच्या टी-20 संघात स्थान दिले आहे. ऋतुराज गायकवाडने टीम इंडियासाठी आतापर्यंत 9 टी-20 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 16.88 च्या सरासरीने केवळ 135 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

SCROLL FOR NEXT