Ruturaj Gaikwad esakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad : ऋतुराज कसोटी मालिकेला मुकला, अभिमन्यू इश्वरनला मिळणार संधी

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी सालमीवीर ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली होती. मात्र त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने कसोटी मालिकेला तो मुकणार आहे. बीसीसीआयने त्याच्या ऐवजी अभिमन्यू इश्वरनची निवड केली आहे.

बीसीसीआयने ऋतुराजच्या रिप्लेसमेंटची अधिकृत घोषणा ट्विट करून केली. या ट्विटमध्ये भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघात होणाऱ्या मालिकेसाठी देखील संघात बदल केल्याचे जाहीर करण्यात आलं.

वेगवान गोलंदाज हर्षित राणा देखील दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या चार दिवसाच्या सामन्याला मुकणार आहे. हा सामना 26 डिसेंबरलाच विलोव्हमोर पार्क बेनोनि येथी होणार आहे. राणाचा मांडीचा स्नायू दुखावला आहे. यानंतर निवडसमितीने भारतीय अ संघात अनेक बदल केले.

बदललेल्या भारतीय अ संघ :

अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, नवदीप सैनी, आकाश दीप, विध्वत करीअप्पा, मानव सुतार आणि रिंकू सिंह.

कुलदीप यादवला भारतीय अ संघातून रिलीज करण्यात आलं आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

SCROLL FOR NEXT