Ruturaj Gaikwad On MS Dhoni  esakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad On MS Dhoni : धोनीनं मेसेज पाठवला होता की... ऋतुराजने सांगितलं CSK च्या कर्णधारानं काय दिला कानमंत्र

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad On MS Dhoni : भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्यानंतर चौथ्या सामन्यात देखील परिस्थिती लक्षात घेत खेळ केला. ऋतुराजच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशासाठी त्याने महेंद्रसिंह धोनीने दिलेल्या कानमंत्राला श्रेय दिले.

ऋतुराज गायकवाडने सध्या सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 4 सामन्यात 213 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 71.00 असून यात एका शतकी आणि एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे.

जिओ सिनेमावर क्रिकेट प्रेझेंटरशी बोलताना ऋतुराज म्हणाला की, 'मी टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधील बारकाव्यांबद्दल चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना खूप काही शिकलो. माही भाई कायम सांगतात की परिस्थिती ओळखून खेळण्याचा कायम प्रयत्न कर.'

ऋतुराज पुढे म्हणाला की, 'धोनी भाईने मेसेज पाठवला होता की संघाच्या धावसंख्येकडे लक्ष ठेव त्यानुसार संघाची गरज काय आहे ते ओळखून खेळ कर. टी 20 क्रिकेटमध्ये तुम्ही कायम मानसिकदृष्ट्या पुढं असलं पाहिजे. मी या गोष्टीला खूप महत्व देतो.'

'मी रात्री उद्याच्या सामन्यात कोणती परिस्थिती उद्भवू शकते याचा विचार करत होता. खेळपट्टी कशी खेळेल याचा विचार करत होतो.' ऋतुराज गायकवाड हा 2019 पासून चेन्नईकडून खेळतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT