Ruturaj Gaikwad Asian Games 2023 esakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad : वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगलं; ऋतुराज सर्व दुःख बाजूला सारून म्हणतो आता एकच लक्ष्य...

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad Asian Games 2023 : बीसीसीआयने चीनमध्ये होणाऱ्या 19 व्या एशियन गेम्ससाठी आपला पुरूष आणि महिलांचा क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात होणार असून बीसीसीआयने आपल्या पुरूष आणि महिलांच्या संघाची घोषणा देखील केली आहे.

बीसीसीआयने महिलांचा आपला अव्वल संघ निवडला आहे. मात्र याचदरम्यान भारतात वनडे वर्ल्डकप होणार असल्याने पुरूषांचा मात्र ब संघ पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. पुरूष संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड करणार असून या संघात सर्व युवा खेळाडूंचा समावेश आहे.

यापूर्वी एशियन गेम्ससाठी बीसीसीआय शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ पाठवणार अशी चर्चा होती. मात्र बीसीसीआयने संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ही ऋतुराजकडे सोपवली. जरी ही ऋतुराजसाठी मोठी गोष्ट असली तरी याला एक दुःखाची किनार देखील आहे. कारण या संघातील 20 खेळाडूंचा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधून पत्ता कट होणार आहे.

मनात वर्ल्डकप खेळण्याची संधी न मिळाल्याचे दुःख घेऊन ऋतुराज गायकवाडने आता एशियन गेम्ससाठी कंबर कसली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत ऋतुराजने आपली प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'ही संधी दिल्याबद्दल बीसीसीआय, संघ व्यवस्थापन आणि निवडसमितीचे आभार. भारताकडून खेळायला मिळणे हीच मोठी गोष्ट असते. अशा मोठ्या स्पर्धेसाठी संघात निवड होणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही माझ्यासाठी आणि संघातील इतर खेळाडूंसाठी देखील मोठी संधी आहे.'

'आम्ही सर्व युवा खेळाडू गेल्या वर्षभरापासून एकत्र आहोत. आयपीएलमध्ये एकमेकांविरूद्ध खेळत आहोत. भारतकडून देखील आम्ही काही सामने एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे यांच्यासोबत खेळण्यात मजा येणार आहे. आम्ही एशियन गेम्समध्ये आपल्या खेळाडूंना खेळताना पाहतच मोठे झालो आहोत. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणे हे खूप खास असेल.'

'आम्ही ज्या प्रकारचं क्रिकेट खेळतोय ते पाहता सामना पाहण्यात मजा येईल. त्यामुळे आम्हाला फॉलो करा आणि आम्हाला पाठिंबा द्या. एशियन गेम्समध्ये आमचं ध्येय हे सुवर्ण पदक जिंकणे, पोडियममध्ये उभे राहणे आणि आपले राष्ट्रगीत गाणे हे आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल; नवी मुंबईच्या डी वाय पाटीलवर होणार फायनलसह ५ सामने

Akola News: धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म; रेल्वे स्टेशनवर डॉक्टरच्या अनुपस्थितीने संताप

'या' ठिकाणी झालेलं 'आयत्या घरात घरोबा' या गाजलेल्या चित्रपटाचं चित्रीकरण; पाहून वाटत नाही पण तो बंगला...

Maharashtra Latest News Live Update : शिर्डीत साई समाधीसह साजरा झाला पारंपरिक बैलपोळा

Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!

SCROLL FOR NEXT