KL Rahul And Virat Kohli
KL Rahul And Virat Kohli Sakal
क्रीडा

रोहितच्या अनुपस्थितीत कोहलीनं लावली फिल्डिंग? KL Rahul उप-कर्णधार!

सुशांत जाधव

South Africa vs India Test : भारतीय संघ सेंच्युरियन कसोटी सामन्यातून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (Team India Tour OF South Africa) सुरुवात करणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कसोटी संघाच्या उप कर्णधार पदाची जबाबदारी ही रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्यात आली होती. मात्र स्नायू दुखापतीमुळे त्याला आयत्यावेळी कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे भारतीय संघाच्या उप-कर्णधार पदाची धूरा कोण सांभाळणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आता रोहितच्या जागी लोकेश राहुलकडे उप-कर्णधारपद (KL Rahul Vice Captain ) देण्यात आले आहे. 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे कसोटीतून भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात करेल.

रोहितच्या अनुपस्थितीत विराटनं लावली फिल्डिंग

या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या डावाला दमदार सुरुवात करण्याची जबाबदारीही लोकेश राहुलवर असेल. लोकेश राहुल किंग कोहलीचा लाडला आहे. टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोडल्यानंतर कोहलीकडून वडेची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. नेतृत्वबदलाच्या या घटनाक्रमानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कोहलीने बीसीसीआयसोबत थेट पंगा घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्व बदलाची शक्यता नाकारता येत नाही.

जर भविष्यात भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वात मोठी उलथापालथ झाली तर लोकेश राहुल कसोटी संघाच्या कर्णधाराच्या शर्यतीत दिसू शकतो, हेच या घडामोडीतून समोर येते. जर बीसीसीआय निवड समिती कसोटी संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे देण्यास तयार असली, तर कोहली कसोटी संघाचे नेतृत्व सोडून पूर्णपणे फलंदाजीवर फोकस करण्याचा मोठा निर्णय घेण्यास मागे पडणार नाही.

कसोटीचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर मोजक्या खेळाडूंमध्ये लोकेश राहुलचा समावेश होता. तिन्ही क्रिकेट प्रकारात लोकेश राहुलचे टीम इंडियातील स्थान जवळपास पक्के असते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील त्याची कामगिरी त्याच्यासाठी नवी संधी निर्माण करणारी असेल.

कॅप्टन्सीत दमदार कामगिरी

केएल राहुलनं आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन दाखवली होती. पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना त्याने 13 सामन्यात 62.60 च्या सरासरीने 626 धावा केल्या होत्या. मागील हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजांमध्ये ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसी जोडीनं राहुलला ओव्हर टेक केलं असले तरी सरासरीच्या बाबतीत तो अव्वल ठरला होता. नेतृत्वात त्याने एकाकी गड लढवल्याच्या गोष्टीनं देखील बीसीसीआय निवड समितीला त्याने प्रभावित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheetal Mhatre : ''खासदारकीसाठी तुम्ही दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?'', शीतल म्हात्रेंचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

Lok Sabha Election: मतदान करा अन् मोफत मिळवा पोहे-जिलेबी, सिनेमाचं तिकीट.. कुठे मिळतायत या भन्नाट ऑफर्स? जाणून घ्या

Sharad Pawar : ...आणि शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला!

Sikandar: ठरलं! 'सिकंदर'मध्ये सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार 'ही' अभिनेत्री

SCROLL FOR NEXT