Quinton De Kock  Sakal
क्रीडा

SA vs IND : क्विंटनची कमाल; टीम इंडियाविरुद्ध सेंच्युरीचा 'षटकार'

सुशांत जाधव

क्विंटन डिकॉकनं अवघ्या 16 व्या डावात 6 शतके झळकावली आहेत.

South Africa vs India, 3rd ODI : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉकनं टीम इंडियाविरुद्ध विक्रमी शतक झळकावलं. टॉस गमावल्यानंतर आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. 70 धावांवर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तीन विकेट गमावल्या होत्या. संघाला सुरुवातीच्या पडझडीतून सावरत क्विंटन डिकॉकनं शतक साजरं केले. त्याने दुसेनच्या साथीनं संघाचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी या जोडीनं 144 धावांची भागीदारी केली. क्विंटन डिकॉक 124 धावा करुन तंबूत परतला.

बाद होण्यापूर्वी क्विंटन डिकॉकनं (Quinton De Kock) खास विक्रम आपल्या नावे केला. टीम इंडियाविरुद्ध (Team India ) त्याने सहावे शतक झळकावले. भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्यानं 85 डावात टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक 7 शतकं झळकावली आहेत. क्विंटन डिकॉकनं अवघ्या 16 व्या डावात 6 शतके झळकावली आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 32 डावात 6 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावे देखील 59 डावात 6 शतकांची नोंद आहे. त्यापाठोपाठ श्रीलंकन दिग्गज कुमार संगकाराने 71 डावात 6 शतक ठोकली आहेत. या सर्वांना मागे टाकत क्विंटन डिकॉक दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. सर्वात वेगाने भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याच्या तो उंबरठ्यावर आहे.

एका संघा विरुद्ध 6 शतक झळकवणाऱ्या अन्य फलंदाजांमध्ये विरेंद्र सेहवागचाही नंबर येतो. सेहवागनं 23 डावात न्यूझीलंड विरुद्ध सहा शतके ठोकली होती. ऑस्ट्रेलियन एरॉन फिंचनं इंग्लंड विरुद्ध 23 डावात 6 शतके करुन दाखवली आहेत. पाकिस्तानी सलामीवीर सईद अन्वरच्या नावे श्रीलंकेविरुद्ध सहा शतकांची नोंद आहे. त्याने 26 डावात हा पराक्रम करुन दाखवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT