Virat Kohli Sakal
क्रीडा

किंग कोहलीनं मोडला तेंडुलकरचा विक्रम; द्रविड गांगुलीलाही टाकले मागे

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडित काढला. आफ्रिकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियासमोर 297 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार लोकेश राहुल स्वस्तात माघारी फिरला. लोकेश राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. त्याने 9 धावा पूर्ण करताना खास रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. सचिन तेंडुलकरला मागे टाकत परदेशात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम आता कोहलीच्या नावे नोंद झाला आहे. (Virat Kohli Break Sachin Tendulkar Sourav Ganguly Rahul Dravid Records)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या (Virat Kohli) खात्यात परदेशात खेळताना वनडेत एकूण 5057 धावा होत्या. वनडेमध्ये पदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावे होता. त्याने 5065 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने पहिल्या वनडेत 9 धावा करताच त्याने सचिनचा हा विक्रम मागे टाकला.

याशिवाय 27 धावांचा टप्पा पार करताच कोहलीनं (1287) राहुल द्रविड (1309) आणि सौरव गांगुली (1313) गांगुली यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मागे टाकला. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. वनडेत तेंडुलकर आफ्रिकेविरुद्ध 2001 धावा कुटल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 27 धावा करताच कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. वनडेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत केवळ सचिन तेंडुलकर कोहलीच्या पुढे आहे.

कोहलीसाठी हा सामना खास असाच आहे. टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडेची कॅप्टन्सी काढून घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीनं आणखी एक मोठा निर्णय घेतला. त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. आता कोहली बॅटिंगवर फोकस करणार आहे. जवळपास दोन वर्षांपासून त्याच्या भात्यातून शतक झालेले नाही. ही प्रतिक्षा पहिल्या वनडेत संपवून तो आपल्या खात्यात आणखी एक शतक नोंदवण्यासाठी उत्सुक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT