sachin tendulkar 50th birthday and rajya sabha membership controversy marathi News  
क्रीडा

Sachin Tendulkar : तेवढी एक चुक अन् सचिन तेंडुलकरला संसदेत झाला होता विरोध

रोहित कणसे

क्रिकेटच्या मैदानावर आजही सचिन तेंडुलकरचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सचिन हा केवळ एक खेळाडू नव्हता तर करोडो भारतीयांचा आशास्थान होता. वयाच्या 17 व्या वर्षी सचिनने पहिला सामना खेळला अन् 2013 मध्ये त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला तेव्हा तो 40 वर्षांचा होता. आज मास्टर ब्लास्टर 50 वर्षांचा झाला आहे. क्रिकेट कारकीर्दीत शेकडो रेकॉर्ड नावावर केलेला हा महान खेळाडू आजही आपल्या प्रतिमेबाबत खूप काळजी घेतो.

पण एक काळ असा होता की देशाच्या संसदेत सचिनला कडाडून विरोध झाला होता. सचिनला विरोध कोण करत होतं आणि याचे कारण काय? चला जाणून घेऊया.

सचिन तेंडुलकरला देशाच्या संसदेचे वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत खासदार म्हणून नामांकन देण्यात आले होते, परंतु तो यासाठी कदाचित तो तयार नव्हता. खासदार म्हणून निवड झाल्यानंतर सचिनने संसदेत क्वचितच वेळ घालवला आहे. सदस्यत्व मिळाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांने संसदेत पहिला प्रश्न विचारला.

क्रिकेट खेळत असताना 2012 मध्ये त्यांना खासदार करणे हाही चुकीचा निर्णय होता असे बोलले जाते. कदाचित याआधीच्या इतर खासदारांप्रमाणे सचिननेही चूक केली आणि राज्यसभेचे सदस्यत्व जबाबदारीपेक्षा सन्मानाचे मानले. मात्र यामुळेच त्याला विरोधाला समोरे जावे लागले.

सचिनच्या अनुपस्थितीबाबत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सर्वप्रथम प्रश्न उपस्थित केला होता, ते म्हणाले, संसद ही अशी जागा नाही की जिथे तुम्हाला लोकांचे विचारपूस करण्यासाठी बोलावलं जावं. हे एक महत्वपूर्ण ठिकाण आहे. जिथे गंभीर विषयांवर चर्चा होतात. प्रसिद्ध व्यक्तींना इथे येण्याच्या इच्छा नसेल, तर त्यांनी संसदेचं सदस्यत्व स्वीकारू नये.

खासदार नरेश अग्रवाल यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर अंतर्गत हा मुद्दा उपस्थित करताना म्हटले होते की, सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यासह काही नामनिर्देशित सदस्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजाला उपस्थित राहिले नाहीत.

जर हे लोक नियमितपणे सभागृहात येत नसतील तर याचा अर्थ त्यांना त्यात रस नाही. अशा स्थितीत त्यांनी राजीनामा देऊ नये का? अग्रवाल यांनी उपसभापतींना आपल्या कार्यालयाच्या वतीने या सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्याची मागणी केली.

ठेवा भारताच्या राष्ट्रपतींना क्रीडा, कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवेशी संबंधित 12 लोकांना राज्यसभा खासदार म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार आहे. याअंतर्गत सचिन आणि रेखासारखे सेलिब्रिटी राज्यसभेचे खासदार झाले. सध्या देशातील कला क्षेत्रातून सामाजिक कार्याशी संबंधित रघुनाथ महापात्रा, सोनल मानसिंग आणि राम सकल यांना नामांकन मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT