sachin tendulkar
sachin tendulkar file photo
क्रीडा

सचिनकडून कोरोना नियमाचे उल्लंघन? पुण्यात गोल्फचा घेतला आनंद

सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने माजी गोलंदाज अजित आगरकरच्या साथीने कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोघांनी कोरोनाचा प्रोटॉकॉल (Covid 19 Protocols) मोडून पुण्यातील गोल्फ खेळण्याचा आनंद घेतल्याची चर्चा रंगली आहे. मुळशी तालुक्यातील ऑक्सफोर्ट गोल्फ कोर्स (Oxford golf course) येथे दोन्ही माजी क्रिकेटर्स शुक्रवारी उपस्थितीत होते, असे बोलले जाते.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व खेळाची मैदाने लॉकडाउन असताना या दोघांनी खेळाचा आनंद कसा घेतला? कोरोनामुळे पुण्यात कडक निर्बंध आहेत. या परिस्थितीत यांना खेळाची परवानगी कोणी दिली? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. सचिन तेंडुलकरने मुंबईहून पुणे प्रवास करताना ई पास काढला होता का? असा प्रश्नही उपस्थिती झाला आहे. पुण्यातील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्टच्या व्हीव्हीआयपी पार्किंगमध्ये शुक्रवारी सचिन तेंडुलकरची कार दिसून आली होती. ही कार सचिनचीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झालीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT