Sachin Tendulkar sakal
क्रीडा

Sachin tendulkar birthday : ‘मारुती ८००’ मधून वाढदिवसाचा प्रवास

कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सचिनचे औक्षण करण्यात आले त्यानंतर अतुल्य मफतलाल यांनी त्याचे स्वागत केले आणि बरोबर मुहूर्तालाच सचिनने स्वाक्षरी केली.

सकाळ डिजिटल टीम

अनिल जोशी

हॅरिस शिल्ड शालेय स्पर्धेत विश्वविक्रमी भागीदारी केल्यानंतर सचिन आणि विनोद यांना वय कमी असल्यामुळे `सनग्रेस मफतलाल`मध्ये थेट नोकरी देता येत नव्हती त्यामुळे १८ व्या वर्षांपर्यंत आम्ही त्यांना शिष्यवृत्ती दिली होती. पुढे १८ वर्षे पूर्ण होताच त्यांना कंपनीत अधिकृतपणे समाविष्ट करून घेण्यात आले.

२४ एप्रिल १९९० रोजीच सचिनला आम्ही त्याच्या नोकरीचे स्वागत पत्र एक कार्यक्रमाद्वारे नरिमन पॉइंट येथील कार्यालयात देणार होतो...तयारी पूर्ण झाली होती. सचिनने निळ्या रंगाची नवी मारुती ८०० घेतली होती. आपल्या गाडीनेच नरिमन पॉइंटपर्यंत जायचे हा सचिनचा हट्ट. पण त्या अगोदर वाढदिवसानिमित्ताने गुरू रमाकांत आचरेकर यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्हाला भोईवाड्यात जायचे होते. साहित्य सहवास ते भोईवाडा असा प्रवास आम्ही केला.

पण भोईवाड्यातून नरिमन पॉइंटला जाण्याचा मार्ग माहित नव्हता. बर त्यावेळी मोबाईलच नसल्याने जीपीएस वगैरेचा प्रश्नच नव्हता. रस्ते चुकत आम्ही निघालो खरे पण मुहूर्त चुकायला नको होता. कारण मफतलाल कुटूंबाने सचिनच्या आगमनाचा आणि त्याच्या हाती पत्र सूपूर्द करण्याची मुहूर्ताची वेळ निश्चित केली होती कसे बसे आणि पाच मिनिटे अगोदर तेथे पोहोटलो आणि सर्वांनीच निश्वास टाकला.

कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सचिनचे औक्षण करण्यात आले त्यानंतर अतुल्य मफतलाल यांनी त्याचे स्वागत केले आणि बरोबर मुहूर्तालाच सचिनने स्वाक्षरी केली. त्याच्यासाठी खास कॅबिनही तयार करण्यात आली होती तेथेही पुजा करण्यात आली आणि अर्थातच त्याच्या १८ व्या वाढदिवसाचा केप कापण्यात आला. माझ्यामते त्यानंतर सचिनचा जाहीररित्या वाढदिवस साजरा करण्याची ही परंपरा आता ५० व्या वर्षापर्यंतही कामय आहे.

खेळाडूंना नोकरी मिळाली की अनेकदा केवळ कंपनीकडून केवळ मोठ्या सामन्यात खेळण्यावर भर असतो, पण सामना कोणताही असो सचिनसाठी तो श्रेष्ठच असायचा. आग्र्याला शहीद स्मृती अशी एका स्पर्धा होती. त्यात सनग्रेस मफतलालचा संघ होता. संदीप पाटील कर्णधार होता संघात तसे तगडे खेळाडू होते.

सचिन एका आंतररराष्ट्रीय दौऱ्यावरून परतला होता आणि सुनील वालसन याचा गौरवनिधी सामना त्याला दिलेल्या शब्दामुळे सिलिगुडीमध्ये खेळायला गेला शुक्रवारचा तो दिवस आणि शहीद स्मृती स्पर्धेचा आमचा अंतिम सामना आग्राला रविवारी होता. हा अंतिम सामना मी खेळणार आहे, असा शब्द सचिनने दिला होता, पण सिलिगुडी ते आग्रा म्हणजे दोन टोकच बर सरळ मार्गही नाही. पण केवळ जिद्द आणि दिलेला शब्द म्हणून मोठी कसरत करून सचिन आला...

अफलातून कमिटमेंट

शनिवारी सकाळी ११ वाजता सचिन चार्टर्ड विमानाने कोलकतापर्यंत आला कोलकता ते दिल्ली विमानप्रवास आणि दिल्लीत आल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी दिल्ली ते आग्रा या प्रवासासाठी कार तयार ठेवली होती. तो चार ते पाच तासांचा प्रवास असे करत करत सचिन रात्री १२ वाजता हॉटेलवर आला. मे महिना असल्यामुळे सकाळी ७ वाजता सामना सुरू होणार होता. रात्री जेवण झाल्यानंतर उद्याच्या सामन्याच्या रणनितीची चर्चा होत होती.

पण एकीकडे या चर्चेत सहभागी होत असताना सचिन उद्याच्या सामन्यासाठी आपली किट बॅग तयार करत होता. एवढ केल्यानंतर सकाळी ६ वाजता हा तयार होऊन लॉबीत आलाही. खर तर सचिन यावेळी मोठा स्टार झाला होता, पण आपल्याला नोकरी देणाऱ्या कंपनीसाठी त्याची कमिंटमेंट थक्क करणारी होती.

सचिन-संदीपचे दे दणादण...

आमच्या संघात सुपरस्टार असल्यामुळे यजमान संघाने खराब खेळपट्टी तयार केली होती फलंदाजी सोपी नव्हती. आम्हाला जिंकण्यासाठी ८ षटकांत ८० धावा हव्या होत्या. आत्ताच्या टी-२० च्या जमान्यात एवढ्या धावा करणे कठिण नाही. पण त्याकाळी वेगळे चित्र होते. शितपेयाची वेळ झाली आणि कर्णधार असलेला संदीप सचिनला सुचना देत होता, सचिन मान खाली घालून ऐकत होता एवढेच पण त्यानंतर या दोघांचे तुफान आले. दे दणादण फटकेबाजी सुरू झाली.

पाच षटकांतच ८० धावा या दोघांनी केल्या आणि आम्ही विजेते ठरलो. सचिनच्या अशा अनेक खेळी टिव्हीवरून प्रेक्षकांनी पाहिल्या असतील पण खराब विकेटवरील अशा एका अविस्मरणीय खेळीचा मी साक्षिदार होतो याचा मला अभिमान आहे.

(लेखक सचिनचे सनग्रेस मफतलालमधील सहकारी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे माजी प्रशासकीय कर्मचारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT