Sachin Tendulkar Father Birth Anniversary 
क्रीडा

Sachin Tendulkar : 'आज मी सर्व काही त्याच्यामुळेच…' क्रिकेटचा देव अचानक झाला भावूक

Kiran Mahanavar

Sachin Tendulkar Father Birth Anniversary : आज क्रिकेटचा देव भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या वडिलांचा वाढदिवस आहे. वडिलांची आठवण काढत सचिनने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सचिनने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तो सध्या जो काही आहे तो त्याच्या वडिलांमुळे आहे. सचिनची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. सचिनच्या वडिलांचे 1999 मध्ये निधन झाले. त्यावेळी सचिन इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळत होता.

सचिनला वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो भारतात परतला. त्यानंतर घरच्यांच्या आग्रहास्तव तो परत वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला. आणि पुढच्या सामन्यात केनियाविरुद्ध शतक झळकावले. सचिनने हे शतक त्याच्या वडिलांना समर्पित केले होते.

सचिनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून वडिलांचा फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याचे वडील, त्याची पत्नी अंजली आणि तो दिसत आहे. सचिनने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे वडील कडक नव्हते तर काळजी घेणारे होते. त्यांनी मला आयुष्यात काय करायचे आहे ते करून दिले आणि माझे स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मला नेहमी पाठिंबा दिला. आज मी सर्व काही त्याच्यामुळेच आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. मला तुमची रोज आठवण येते.

19 मे 1999 रोजी सचिनच्या वडिलांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सचिनचे वडील मराठी साहित्यिक होते. त्यांनी मराठीत कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. सचिनने त्याच्या आयुष्यात वडिलांच्या प्रभावाबद्दल अनेकदा बोलले आहे. वडिलांच्या निधनानंतर सचिनने केनियाविरुद्ध वर्ल्ड कप सामना खेळला आणि 101 चेंडूत 140 धावांची खेळी केली. या सामन्यात त्याने राहुल द्रविडसोबत 237 धावांची भागीदारी केली होती. भारताने हा सामना 94 धावांनी जिंकला. सचिनने हे शतक त्याच्या वडिलांना समर्पित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT