Sachin Tendulkar Romantic Post For Wife Anjali Tendulkar  esakal
क्रीडा

Sachin Tendulkar VIDEO : अर्जुनच्या पहिल्या शतकानंतर पत्नी अंजलीसाठी सचिनची रोमँटिक पोस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Romantic Post For Wife Anjali Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने आपल्या पदार्पणाच्या रणजी सामन्यात शतकी खेळी करत सचिन तेंडलुकरच्या 32 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून खेळताना राजस्थानविरूद्ध 120 धावांची शतकी खेळी केली. आपल्या मुलाच्या या दमदार कामगिरीनंतर सचिन तेंडलुकरने सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट शेअर केली. सचिन तेंडुलकरची ही रोमँटिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो एका रेस्तराँमध्ये बसल्याचे दिसते. यावेळी सचिन तेंडुलकर आपल्या हातात एक प्लेट घेतो यावर एक रोमँटिक वाक्य लिहिले होते. यानंतर कॅमेरा सचिनची पत्नी अंजली यांच्याकडे पॅन होतो. यावेळे अंजली हसताना दिसतात.'

सचिन तेंडुलकर कायम आपल्या यशाचे श्रेय हे पत्नी अंजलीला देत असतो. तो 2019 च्या एका मुलाखतीत म्हणाला होता की, 'मी भारताकडून चांगली कामगिरी करतो होतो. याच दरम्यान, अंजली देखील तिच्या परीक्षेत पहिली आली होती. तुम्हाला माहिती आहे की ती गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहे. तिचे करिअर देखील फुलत होते. ती एका वेगळ्याच उंचीवर पोहचली असती. मात्र तिने कुटुंबासाठी आपल्या करिअरचा त्याग केला.'

सचिन पुढे म्हणाला होता की, 'तिला माहिती होतं की मला खूप प्रवास करावा लागणार आहे. मग अशा परिस्थितीत सारा आणि अर्जुनकडे कोण लक्ष देणार? तिने मोठ्या मनाने निर्णय घेतला. तिच्या निर्णयामुळेत मी आज इथपर्यंत पोहचलो आहे. हे तिच्या योगदानाशिवाय शक्यच झालं नसतं. मी इथं बसू देखूल शकलो नसतो.'

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahu Maharaj on Gokul : 'गोकुळमध्ये जातीयवाद-धर्मवादाचा प्रश्नच येत नाही'; शाहू महाराजांनी मुश्रीफांचा दावा काढला खोडून, कामकाज सुरळीत करण्यासाठी सुचवला 'हा' पर्याय

माधुरी दीक्षितसोबतच्या 27 वर्षांच्या सुखी संसाराचं गुपित काय? श्रीराम नेने म्हणाले, “कठीण काळात…”

Gokul Chairman Election Dispute : 'गोकुळ' अध्यक्षपदाचा वाद पोहोचला कोर्टात; शशिकांत चुयेकरांच्या निवडीबाबत सोमवारी निर्णय, महायुतीच्या 12 संचालकांनाही धाडली नोटीस

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी बंद

Radhanagari Wildlife Sanctuary : पर्यटकांसाठी खूशखबर! 'या' तारखेपासून दाजीपूर-राधानगरी जंगल सफारी सुरू; अभयारण्यात काय काय असणार खास?

SCROLL FOR NEXT